Santosh Deshmukh Case: पक्ष बघणार नाही, दोषी आढळला तर कडक कारवाई; धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर अजित पवार यांचं रोखठोक उत्तर

Ajit Pawar on Santosh Deshmukh case : माजी सरपंच हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव येत असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजित पवार यांनी रोखठोक उत्तर दिलंय.
Ajit Pawar Press Conference
Ajit Pawar on Santosh Deshmukh case Saam Tv
Published On

कुठल्याही चौकशीत आरोप झाला तर तुम्ही दोषी आहे, आज एसआयटी चौकशी चालू आहे. सीआयडी चौकशी चालू आहे. न्यायालयीन चौकशी चालू आहे. तीन वेगवेगळ्या एजन्सी चौकशी करतात. स्वतः राज्याच्या मुख्यमंत्री सांगितले आहे. जो कुणी दोषी असेल, जो संबंधित असेल तर ते सिद्ध झालं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत.

बीडमधील सरपंच हत्याप्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहे. भाजप आमदार सुरेश धस हे वारंवार धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. धनंजय मुंडे प्रककरणावरुन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य आपली भूमिका मांडलीय.

Ajit Pawar Press Conference
Walmik Karad Property: पुण्यात आकाच्या ड्रायव्हरच्या नावाने फ्लॅट; वाल्मिक कराडवर सुरेश धस यांचा गंभीर आरोप

माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वेगवेगळ्या तपास यंत्रणेकडून तपास चालू आहे. आता कुठल्याही चौकशीत आरोप झाला तर तुम्ही दोषी आहे, आज एसआयटी चौकशी चालू आहे. सीआयडी चौकशी चालू असल्याचं अजित पवार म्हणालेत. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव येत आहे. यावरून पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न केला. त्यावर अजित पवार यांनी रोखठोक उत्तर दिलंय. बीड प्रकरणात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आहोत. या संदर्भात पक्ष न बघता जर कुणी वरिष्ठ पातळीवर काम करणारे व्यक्ती दोषी असतील तर कुणाचीही गय करू नका. मुख्यमंत्रीही त्या त्या मताचे आहेत असं अजित पवार म्हणालेत.

Ajit Pawar Press Conference
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला महिना उलटला, आंधळे मात्र फरारच, SIT ला देतोय गुंगारा

प्रत्येकाची चौकशी करून किती फोन झले, कुणाचे कितीफोन कुणाला झाले, याचा बारकाईने लक्ष दिलं जात आहे. तितक्यात गांभीर्याने सरकारने लक्ष दिले आहे. अर्थात समोरील विरोधी पक्षातील लोकांना, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधींनी काय बोलायचे याचे अधिकार दिले आहेत. पण कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यायला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com