Chhatrapati Sambhaji Nagar Crime News saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar News : विवाहित महिलेवर अत्याचार करून हत्या; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Chhatrapati Sambhaji Nagar News : एका विवाहित महिलेवर तीन नराधमांनी अत्याचार केला. त्यानंतर डोक्यात दगड घालून तिची हत्या केली.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेवर तीन नराधमांनी अत्याचार केला. त्यानंतर डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. याप्रकरणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. (Latest Marathi News)

निता (वय ३२ वर्षे) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मृत महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत (Police) दाखल केलेल्या तक्रारीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या निता या लघुशंकेसाठी गेल्या होत्या. त्यांच्या सोबत कुणी नसल्याचं पाहून अंधाराचा फायदा घेत आरोपींनी त्यांना अडवलं. त्यानंतर त्यांना नग्न करून झाडाला बांधून अत्याचार केला.

धक्कादायक म्हणजे अत्याचारानंतर (Crime News) आरोपींनी महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. दरम्यान, याबाबत महिलेच्या नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांनी घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा निताचा मृतदेह शहरातील विमानतळाच्या भिंतीलगत असलेल्या मोतीवाला कॉलनी परिसरात अर्धनग्न , हात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला.

घटनेचे गांभिर्य लक्षात घेत पोलीसांनी, विविध तपास पथके तयार करुन आरोपींच्या शोध घेण्यासाठी रवाना केली. त्यानंतर तीन संशयित आरोपींना अटक केली. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT