Samruddhi Highway News : समृद्धी महामार्गावरील अपघात कमी होणार? सरकारने आखला मोठा प्लॅन

Samruddhi Express Way : समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटना लक्षात घेता रस्ते आणि परिवहन विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Mumbai Nagpur Samruddh Magamarg News
Mumbai Nagpur Samruddh Magamarg NewsSaam TV
Published On

Mumbai Nagpur Samruddh Mahamarg News : विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांच्या घटनेत वाढ होत आहे. समृद्धी महामार्गावर दररोज किरकोळ किंवा भीषण अपघाताच्या घटना समोर येत आहेत. हीच बाब लक्षात घेता महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी राज्य सरकारने मोठा प्लॅन आखला आहे. (Latest Marathi News)

Mumbai Nagpur Samruddh Magamarg News
Samruddhi Mahamarg News : समृद्धी महामार्गावर कोण करतंय दगडफेक? वाहनचालकांमध्ये भीतीचं वातावरण

देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई 701 किमी लांबीच्या समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरशी जोडली जात आहे. हा महामार्ग देशातील सर्वात वेगवान अशा महामार्गांपैकी एक असणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर अपघाताच्या घटना घडत आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटना लक्षात घेता रस्ते आणि परिवहन विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभाग करणार गांधीगिरी करणार असल्याची माहिती आहे.

याशिवाय महामार्गावरील ठराविक वेगाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना थांबवून वाहतूक पोलीस (Police) त्यांचे समुपदेशन करणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार असाल, तर वाहने चालवताना काळजी घेणे गरजेचे आहे.

Mumbai Nagpur Samruddh Magamarg News
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकला कारची मागून धडक; तिघांचा जागीच मृत्यू

राज्यातील रस्ते अपघातांमध्ये १६ टक्क्यांची घट

भरधाव वेग, खड्डे, ओव्हरटेक आणि बेजबाबदारपणे वाहन चालवल्याने गेल्या वर्षभरापासून महामार्गावरील रस्ते अपघातांमध्ये वाढ झाली होती. याशिवाय अपघाती मृत्यूचे प्रमाण देखील वाढले होते.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रस्ते अपघातात १६ टक्क्यांची घट झाल्याची माहिती आहे. मृत्यूच्या प्रमाणावरही परिणाम झाला आहे.मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अपघातात सुद्धा ५० टक्क्यांची घट झाल्याची माहिती आहे.

परिवहन विभागाने सुसाट वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांविरोधात गांधीगिरी सुरू केल्याने अपघातांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याची माहिती आहे. परिवहन विभागाकडून वेगाने वाहन चालवणाऱ्यांविरोधात गांधीगिरी सुरू आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com