Sillod Crime News Saam TV
महाराष्ट्र

Sillod Crime News: मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला; तिथेच घडली भयानक घटना, तरुणाच्या मृत्युने खळबळ

Sambhaji Nagar Crime News: मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणाची चाकून भोसकून हत्या करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणाची चाकून भोसकून हत्या करण्यात आली आहे. सिल्लोड तालुक्यातील वांजोळा गावात ही घटना घडली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संतोष जादुसिग बामनावत (वय २८, रा. वांजोळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री संतोष बमनावत या तरुणाचा वाढदिवस होता. मित्रांसोबत वाढदिवस साजराकरून एका हॉटेलवर त्यांनी पार्टी केली. यानंतर शनिवारी सकाळी हॉटेल गारवा समोरील पाण्याच्या पाटात त्याचा मृतदेह नागरिकांना दिसून आला. (Breaking Marathi News)

सदरील घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस (Police) ठाण्याचे पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह धाव घेतली व मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणला. खून झाल्याची माहिती मिळताच नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली.

ग्रामीण पोलिस रात्रीपासूनच्या घटनाक्रमाची माहिती घेत असून संतोष सोबत पार्टीत असलेल्या त्याच्या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले असून वेगवेगळ्या दिशेने ग्रामीण पोलिस तपास करीत आहे.

या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत संतोष याच शुक्रवारी (५ एप्रिल) वाढदिवस होता. त्या वाढदिवसानिमित्त तो काही मित्रांसोबत डोंगरगाव फाट्यावर (Chhatrapati Sambhaji Nagar) एका हॉटेलवर जेवणासाठी गेला होता. यादरम्यानच त्याचा घात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

त्याचा वाढदिवस त्याचा मरण दिवस ठरल्याने या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी संतोष याचा नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान या खुनाच्या घटनेमुळे सिल्लोड शहरात खळबळ उडाली असून लवकरच या घटनेतील आरोपी गजाआड करण्यात येतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र हादरला! एकट्यात बसलेल्या मुलीवर वाकडी नजर; नराधमाकडून स्वतःच्या घरी नेऊन अत्याचार

Maharashtra Live News Update: शरद पवार बारामतीत अॅक्शन मोडवर

UPI Wrong Transfer: UPI वरून चुकीच्या खात्यात पैसे गेले? नियम काय सांगतो? वाचा...

Tea Types: तुम्हीही चहाप्रेमी आहात? मग चहाचे हे 5 प्रकार नक्की ट्राय करा

Government Aircraft : सरकारी हवाई वाहनांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

SCROLL FOR NEXT