Chhatrapati Sambhaji Nagar Accident Saam TV
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar: महापालिकेच्या कचरा गाडीची दुचाकीला धडक; MGM कॉलेजच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Chhatrapati Sambhaji Nagar Accident: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक भयानक घटना समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

Chhatrapati Sambhaji Nagar Accident News: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक भयानक घटना समोर आली आहे. कॉलेजला जातो म्हणून तरुण हसत खेळत घराबाहेर पडला. दुचाकीवरुन तो कॉलेजला जाण्यासाठी निघाला. मात्र, वाटेतच्या त्याला महापालिकेच्या कचरा गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणाचा दुर्देवी अंत झाला आहे. शहरातील सेंट्रल नाका परिसरात ही घटना घडली.

ओमकार लक्ष्मण थोरात असे मृ विद्यार्थ्याचे नाव असून, तो एमजीएम विद्यापीठामध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे ओंकार हा कॉलेजला जाण्यासाठी दुचाकीवरून निघाला. शहरातील सेंट्रल नाका चौकात तो आला असता, विरुद्ध दिशेने येणाऱ्या महापालिकेच्या कचरा गाडीने त्याला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, कचरा गाडीने ओंकारला दुचाकीसह २० ते ३० फूट फरफट नेलं. या भीषण अपघातात ओंकारच्या डोक्यावरून कचरा गाडीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ओंकारच्या अचानक निघून जाण्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : मनपा, झेडपी निवडणुका होणारच, स्थगिती नाहीच; कोर्टात काय झालं ते शब्द ना शब्द वाचा

Maharashtra Live News Update: बोरीवलीत तांबे वायर चोरी प्रकरणातील दोन चोर अटकेत

Bhakarwadi Recipe: घरच्या घरी बनवा दुकानात मिळते तशी खुसखुशीत बाकरवडी, रेसिपी आजच करा ट्राय

Maharashtra Politics: भाजपमध्ये भूकंप! ऐन निवडणुकीत उभी फूट|VIDEO

सलग ३० दिवस ओट्स खाल्ल्याने शरीरात होतात हे बदल

SCROLL FOR NEXT