Firing Video Viral: घराची बेल वाजवली, नंतर खिशातून पिस्तूल काढून केला अंधाधुंद गोळीबार! थरारक घटना CCTVत कैद

Firing On Door Video Viral : राजधानी दिल्लीतील सिद्धार्थ नगर भागात गोळीबाराची घटना समोर आली आहे.
Delhi Firing Video Viral
Delhi Firing Video ViralSAAM TV
Published On

Delhi Firing Video Viral : राजधानी दिल्लीतील सिद्धार्थ नगर भागात गोळीबाराची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यात दोन तरुण घराची बेल वाजवतात, परंतु कोणीही दरवाजा उघडत नाही. हे पाहून ते दोघे अंधाधुंद गोळीबार सुरू करतात.

या व्हिडिओत तुम्हू पाहू शकता की ते खाली उतरल्यानंतर देखील गोळीबार करतता. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तर या घटनेमुळे परिसरात भीती पसरली आहे. या दोघांनी मिळून एकूण 5 गोळ्या झाडल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय.

Delhi Firing Video Viral
Jalana Crime News: आधी देवदर्शन केले अन् मंदिरासमोरील दुचाकी घेवून पळाला... संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद; पाहा VIDEO

हा व्हिडिओ दक्षिण-पूर्व दिल्लीतील सिद्धार्थ नगरमधील असून रविवारी सकाळी 6.50 वाजता ही घटना घडली. व्हिडिओमध्ये दोन तरुण मास्क घालून पायऱ्या चढताना दिसत आहेत. यातील एक जण खाली उभी राहतो आणि दुसरा पुढे जाऊन घराची बेल वाजवतो. बेल वाजवूनही कोणीही गेट उघडत नाही असे दिसते.

यानंतर तो पुन्हा पुढे आला आणि बेल वाजवसी, तरीही उत्तर मिळाले नाही. यानंतर त्याने संतप्त होऊन खिशातील पिस्तूल काढली आणि थोडं खाली जाऊन ज्या घराची बेल वाजवत होता त्याच घराच्या दारावर अंधाधुंद गोळीबार केला. हा तरुण एकापाठोपाठ दोन गोळ्या झाडताना तुम्ही पाहू शकता. मात्र त्यानंतरही घरातून कोणाचा आवाज आला नाही आणि कोणी गेटही उघडले नाही. (crime news)

Delhi Firing Video Viral
Ratnagiri News: बारसूत बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांची गाडी पलटी, 17 जखमी

यानंतर दोघेही खाली निघून गेले. खालच्या मजल्यावरही या लोकांनी तीन गोळ्या झाडल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घराच्या दरवाजाजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे. हे लोक कोण होते आणि त्यांनी अशा प्रकारे गोळीबार का केला? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com