chhagan bhujbal, ajit pawar, savitribai phule, satara, Chhatrapati Sambhaji Maharaj
chhagan bhujbal, ajit pawar, savitribai phule, satara, Chhatrapati Sambhaji Maharaj saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Maharaj : मी ब्राह्मणांबद्दल बोलत नाही पण..., : छगन भुजबळ

ओंकार कदम

Chhagan Bhujbal News : छत्रपती शिवाजी महाराज गो ब्राम्हण पती पालक होते. म्हणजेच गो ब्राम्हण पती पालक प्रमाणे ब्राम्हणांचे पालक मान्य आहे पण कुणबी, शिवा काशिद असेल दलीत समाजाचे पालक नव्हते का ? असा प्रश्न ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित करुन विराेधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar) यांच्या छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबाबतच्या वक्तव्याबद्दल अभ्यास करून बाेलेन असं स्पष्ट केले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती (savitribai phule jayanti) निमित्त सावित्रीबाई यांच्या नायगाव (जिल्हा सातारा) या जन्मगावी छगन भुजबळ यांनी भेट देत फुले यांना अभिवादन केले. त्यावेळी भुजबळांना माध्यम प्रतिनिधींनी अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत छेडले. त्यावेळी भुजबळ बाेलत हाेते.

भुजबळ म्हणाले अजित पवारांच्या विधानावर आत्ता बोलणार नाही. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यामुळे आत्ता बोलणार नाही..मी अभ्यास करतोय. छत्रपती शिवाजी महाराज गो ब्राम्हण पती पालक होते. म्हणजेच गो ब्राम्हण पती पालक प्रमाणे ब्राम्हणांचे पालक मान्य आहे पण कुणबी, शिवा काशिद असेल दलीत समाजाचे पालक नव्हते का ?

मी ब्राम्हणांंबद्दल बोलत नाही पण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अनेक ब्राह्मणांनी मदत केली आहे. विरोध ही केला. शिवाजी महाराजांसोबत वेगवेगळ्या जातीचे लोक होते पण अभ्यास करून सांगेन असेही भुजबळ यांनी नमूद केले. दरम्यान वादात माध्यमांना जास्त इंटरेस्ट असल्याचे भुजबळांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exercise Tips: व्यायाम करण्याचा कंटाळा येतोय? या पद्धतीने करा व्यायाम,दिवसभर राहाल फ्रेश

Hemant Dhome News : "साहेब आपली क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना..."; हेमंत ढोमेची शरद पवारांसाठीची पोस्ट चर्चेत

T20 World Cup 2024 | टी-२० वर्ल्डकप सुरू होण्याआधीच धडकी भरवणारी बातमी! दहशतवादी हल्ल्याची धमकी

Nana Patole On Narendra Modi | अग्निवीर योजनेबद्दल नाना पटोले काय बोलले?

Hapus Mango : देवगडचा की दक्षिण भारतातला? खरा हापूस आंबां कसा ओळखायचा?

SCROLL FOR NEXT