Chhagan bhujbal on pankaja munde : पंकजा मुंडे यांनी सांगितले म्हणजे त्या लगेच नवा पक्ष काढणार नाहीत, त्या नव्या पक्षाबद्दल विचार करत असतील तर विचार करायला हरकत नाही. याआधी ओबीसीचा मुद्दा घेऊनच शिवसेनेतून बाहेर पडलो होतो, असे छगन भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांच्या नव्या पक्षाच्या वक्तव्यावर बोलताना याआधीचा एक किस्सा सांगितला. त्याशिवाय राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरही त्यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, राज ठाकरेंना सर्वच नेते भेटत असतात. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट असू शकते.
गोपीनाथराव मुंडे माझ्याकडे आले आणि म्हणाले एक वेगळा पक्ष काढू. तुम्ही, मी आणि गणपतराव देशमुख, आठवले एक पक्ष काढू. पक्ष चांगल्या रीतीने पुढे जाईल, मी उपमुख्यमंत्री होतो मला राजीनामा द्यावा लागेल. ते उपनेते होते त्यांना राजीनामा द्यावा लागेल म्हटलं. मी सांगितले मला काही हरकत नाही.
ओबीसीचाच मुद्दा घेऊन मी शिवसेनेतून बाहेर पडलो होतो. ओबीसी अथवा मागासवर्गीयांचा अथवा इतर लहान घटकांचा पक्ष निघत असेल तर विचार करायला हरकत नाही. मग काय झालं माहित नाही, त्यांनी नंतर विषय सोडून दिला. स्वतंत्र पक्ष कुणीही काढू शकतो. पंकजा मुंडे म्हणतात त्याप्रमाणे मोठा पक्ष असू शकतो. पण माझं म्हणणं असे आहे की एका समाजावर पक्ष काढणं आणि यश मिळवणं हे कितपत यशस्वी असेल याची मला कल्पना नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.
कोणताही समाज असो, पण एखाद्या समाजाचा पक्ष यशस्वी होईल असे वाटत नाही. पण त्यांनी म्हटले म्हणून ताबोडतोड पक्ष काढतील असे वाटत नाही. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना माणणारा वर्ग मोठा आहे, असाच त्याचा फक्त अर्थ होतो. पंकजा मुंडे यांनी सांगितले म्हणजे त्या लगेच नवा पक्ष काढणार नाहीत, असे छगन भुजबळ म्हणाले.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. त्यांना एकत्रित केल्यास एखादा पक्ष उभा राहील. मुंडे यांचे गुण आत्मसात केल्यामुळे ही सर्व मंडळी आपल्याशी जोडली गेली आहेत, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी रविवारी केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.