
Four new metro lines to partially open this year : जगातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे मुंबई एमएमआर विभागामध्ये तयार होत आहे. त्याला हळूहळू पूर्ण स्वरूप येत आहे. यंदा मुंबई मेट्रोच्या चार नव्या मार्गिका सुरू होणार आहे. 2B, 4, 4A, आणि 9 हे मेट्रो मार्ग यंदा मुंबईकरांसाठी खुले होणार आहेत. मेट्रोच्या या नव्या मार्गामुळे मुंबई पूर्व उपनगर, ठाणे आणि मीरारोडमधील वाहतूक कोंडी कमी होईल.
2B, 4, 4A, आणि 9 हे मेट्रो मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश सरकारकडून MMRDA ला देण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षात चार मार्ग मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत. त्याशिवाय वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सपासून वरळीमधील आचार्य अत्रे चौकापर्यंत (Bandra Kurla Complex to Acharya Atre Chowk) मेट्रो लाइन 3 चा फेज दोन मार्चमध्ये उघडण्याची शक्यता आहे.
यंदाच्या वर्षात सुरू होणाऱ्या ४ नव्या मेट्रो मार्गिकेची १९ मेट्रो स्थानके जवळपास तयार झाली असल्याची माहिती सरकारमधील एका अधिकाऱ्याने सांगितले. उघडल्या जाणार्या चार मार्गांपैकी सर्वात लांब मेट्रो मार्ग हा ठाण्यातील असेल. ठाण्यात पहिली मेट्रो यंदाच्या वर्षात धावण्याची शक्यता आहे. कॅडबरी जंक्शन ते गायमुख यादरम्यान १० किमीपर्यंतचा मेट्रो मार्ग सुरू होणार आहे.
मुंबई पूर्व उपनगरातील 2B मेट्रो मार्गातील पहिला टप्पा मंडाले (मानखुर्द) ते डायमंड गार्डनर (चेंबूर) असा सुरू होणार आहे. याची लांबी ५.३ किमी इतकी असेल. या मार्गावर पाच मेट्रो स्थानके असतील. 2B हा मार्ग डीएन नगर, अंधेरी पश्चिमला जोडला जाईल, म्हणजेच 2A मेट्रो मार्गाला जोडला जाणार आहे. डीएननगर ते दहीसर पर्यंत 2A मेट्रो धावते. 2B आणि 2A हा मेट्रो मार्ग जोडल्यानंतर मानखुर्द ते दहीसर असा प्रवास करणं सोप्प होईल. 2B हा मेट्रो मार्ग कुर्ला रेल्वे स्थनाकलाही जोडला जाईल, त्याशिवाय मेट्रो ८ लाही कनेक्ट होईल. ज्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाचा प्रवास सोयीस्कर होणार आहे.
मेट्रो ९ मार्ग हा मीरा रोड आणि भाईंदर यादरम्यान असेल. यातील ४.५ किमीचा पाच स्थनाके असणारा दहीसर कासेगाव मार्ग यंदाच्या वर्षी खुला होणार आहे. हा मार्ग पुढे मेट्रो ७ मार्गिकेला (Gundavali to Dahisar) जोडला जाणार आहे. भविष्यात हा मार्ग मेट्रो मार्ग १० (Gaimukh to Shivaji Chowk at Mira Road) जोडला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.