Sharad Pawar and Chhagan Bhujbal Meeting Saam Tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal VIDEO: दीड तासांच्या वेटिंगनंतर शरद पवारांची भेट, बैठकीत कशावर चर्चा? छगन भुजबळांनी सगळं सांगितलं!

Chhagan Bhujbal Press Conference On Sharad Pawar: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली अन् राज्याचे राजकारण ढवळून निघाले. या भेटीवर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर...

Gangappa Pujari

गणेश कवाडे| मुंबई, ता. १५ जुलै २०२४

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली अन् राज्याचे राजकारण ढवळून निघाले. सिल्व्हर ओक या निवासस्थानी दीड तासांच्या वेटिंगनंतर छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट झाली. काल बारामतीच्या सभेत केलेली मोठी टीका अन् आज घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. याभेटीनंतर आता स्वतः छगन भुजबळ यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. मराठा- ओबीसी वादावर पुढाकार घेण्यासाठी ही भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

"राज्यात मराठा- ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मला ना राजकारण करायचं आहे, मला ना मंत्रीपदाची आशा आहे. राज्य शांत राहावं अशी माझी अपेक्षा आहे. त्यासाठीच शरद पवार यांची मी भेट घेतली. या भेटीमध्ये राजकारणाचा कोणताही मुद्दा नव्हता. आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी मी कोणालाही भेटायला तयार आहे," असे छगन भुजबळ म्हणाले.

"मराठा आरक्षण, ओबीसी वादावर तोडगा निघावा याबाबत या भेटीमध्ये चर्चा झाली. मराठा, ओबीसी धनगर यांच्या मागण्या काय आहेत? त्या मी शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. शरद पवार यांनीही याबाबत पुढाकार घेणार असल्याचे सांगितलं आहे. मी दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे," असं शरद पवार म्हणाले असल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

"राज्यात ओबीसी आरक्षण देण्याच काम पवारांनी केले. आता राज्यात काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती आहे. मी त्यांना विनंती केली की तुम्हाला राज्याचा चांगला अभ्यास आहे. आम्हाला सगळा अभ्यास नाही. जातीजातीं मध्ये वातावरण शांत राहवं आणि ते शांत करण्यासाठी तिथे शरद पवार असायला हवेत. अशी माझी मागणी होती," असं छगन भुजबळ म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT