Akola Hit And Run: अकोल्यात हिट अँड रन! भरधाव कारने दुचाकीला उडवलं, पत्नीचा दुर्दैवी अंत, चालक अटकेत

Maharashtra hit And Run Case News: अकोला शहरातून एक मोठी हिट अँड रनची घटना समोर आली आहे. अकोल्यातल्या रेल्वे स्टेशन आणि सिंधी कॅम्प उड्डाण पुलावर ही दुर्घटना घडली.
Maharashtra hit And Run Case News:
Maharashtra hit And Run Case News:Saamtv
Published On

अक्षय गवळी, ता. १५ जुलै २०२४

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनचे सत्रच सुरू आहे. सर्वात आधी पुणे, वरळी, नागपूरमध्ये भीषण अपघाताच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता अकोल्यामधून मोठी हिट अँड रनची घटना समोर आली आहे. शहरातील सिंधी कँप पुलावर पती-पत्नी दुचाकीने जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात कारने जोरदार धड़क दिली. यामध्ये पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Maharashtra hit And Run Case News:
Pune News: पुण्यात झिका पाठोपाठ डेंग्युचा कहर! रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ, धक्कादायक आकडेवारी समोर VIDEO

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोला शहरातून एक मोठी हिट अँड रनची घटना समोर आली आहे. अकोल्यातल्या रेल्वे स्टेशन आणि सिंधी कॅम्प उड्डाण पुलावर ही दुर्घटना घडली. पती-पत्नी दुचाकीवरुन जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात कारने जोरदार धडक दिली. यामध्ये पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रेखाताई सांगळे असे अपघतात मरण पावलेल्या पत्नीचे नाव आहे तर तानाजी सांगळे असे जखमी पतीचे नाव आहे. अपघातानंतर फरार कारचालक घटनास्थळावरुन फरार झाला होता. मात्र घटनास्थळावर कारची नंबर प्लेट तुटून पडल्यामुळे पोलिसांनी त्याचा तातडीने शोध घेतला. अकोला पोलिसांनी अपघातानंतर काही तासात कार चालकाला अटक केली आहे.

Maharashtra hit And Run Case News:
Pune Crime News : जेवणाची चव बिघडली, आचाऱ्यांच्या नाकावर मारला हातोडा; पुढे घडलं असं काही की तुम्हालाही बसेल धक्का

ईस्माइल अहेमद मुमताज अहेमद असे अटक करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. त्याला सिव्हिल लाइन्स पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सूरु आहे. ही कार्यवाही पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे यांनी केली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

Maharashtra hit And Run Case News:
Congress Meeting: विधानपरिषदेतील बंडखोरी भोवणार! काँग्रेस हायकमांड कठोर निर्णयाच्या तयारीत; ७ आमदारांचे ६ वर्षांसाठी निलंबन होणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com