chhagan bhujbal 
महाराष्ट्र

त्याविषयी आदित्य ठाकरेंशी बाेलेन : छगन भुजबळ

ओंकार कदम

सातारा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (savitribai phule) यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त नायगाव (खंडाळा) येथे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी बाेलतना भुजबळ म्हणाले ओबीसी आरक्षणाबाबत देशातल्या सर्व निवडणुका चार महिने पुढे ढकलण्यात याव्या आणि सर्वांना एम्पिरिकल डाटा (empirical data) पुर्ण करण्यास संधी मिळावी अशी विनंती उच्च न्यायालयात केली आहे. त्यांच्या पाठिंब्यासाठी महाराष्ट्र सरकार देखील उभा राहणार असून इतर राज्य सुद्धा यामध्ये सामील होणार आहेत. त्यातून काय निष्कर्ष निघतोय तसं काम करायला मदत होणार आहे.

आत्ता काही यावर बोलणं आणि ते न्यायालयात मांडणं हे योग्य नसल्याचे मत छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे याबाबत आपण थाेडसं थांबूया असेही भुजबळ यांनी नमूद केले. दरम्यान या संदर्भात कामकाज सुरु झाल्याचे भुजबळ यांनी सांगत आयाेग्याचे प्रमुख स्वतः जातीने लक्ष घालीत आहे. त्यासाठी युद्धपातळीवर आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आदित्य ठाकरेंशी बाेलेन

दरम्यान नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर आहे तसं उभे करण्यासाठी प्रयत्न केले. त्याचे काम उत्तम झालेले आहे. येथील स्मारक खूप चांगले उभे झाले असून सर्वांना प्रेरणादायी ठरत आहे. येथे एक रिसाॅर्ट तयार केला हाेता. त्यासाठी मी पर्यटनमंत्री असताना पाच काेटी रुपयांचा निधी दिला हाेता. त्याची आता दुर्दशा झाली आहे. ही वास्तु महाज्याेतीकडे द्यावी असा आमचा मानस आहे. त्यातून शाळा, स्पर्धा परिक्षा केंद्र असे उपक्रम राबविण्याची मागणी आहे. याबाबतचा आवश्यक निधी अथवा संबंधित वास्तु महाज्याेतीकडे सुपुर्द करावा अशी चर्चा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aditya thackreay) यांच्या समवेत करु असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT