Chhagan Bhujbal  Saam Tv
महाराष्ट्र

OBC Melava : क्षीरसागर यांच्या कुटुंबातील लोकांना मुस्लीम बांधवांनी वाचवलं: छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : ओबीसी भटके विमुक्त एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ परत एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. भाषण करताना भुजबळांनी रोहित पवारांनाही निशाणा साधला.

डॉ. माधव सावरगावे

Chhagan Bhujbal Slams Manoj Jarange Patil:

बीड येथे झालेल्या ओबीसी भटके विमुक्त एल्गार मेळाव्यात ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी परत एकदा मनोज जरांगे-पाटील यांच्यावर तोफ डागली. बीडमध्ये झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यावरून टीका करताना भुजबळांनी आंदोलकांना टोला लगावला. शिवाजी महाराज यांचे नाव घेणारे घरं जाळत नाहीत, असं भुजबळ म्हणाले. (Latest News)

बीड आंदोलकांनी जेव्हा क्षीरसागर यांचे घर जाळले तेव्हा नमाज पडण्यासाठी चाललेले मुस्लीम समाजाचे लोक शेख वसीम, अन्सारी जलील, शेख सत्तार यांनी क्षीरसागर यांच्या कुटुंबातील लोकांना वाचवलं. आग लावणारे शिवाजी शिवरायांचे पण आग लावणारे महाराजांचे नाव घेत होते. त्यांच्या नावाच्या घोषणा देत होते. छत्रपती शिवरायांचे नाव घेता अन आपल्याच लोकांना असं करतात का, असा सवाल भुजबळांनी केला.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ओबीसी भटके विमुक्त एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ परत एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. भाषण करताना भुजबळांनी रोहित पवारांनाही निशाणा साधला. बीडमधील हिंसक आंदोलनाची आठवण करून देताना भुजबळ म्हणाले मुस्लीम बांधवांनी क्षीरसागर यांच्या कुटुंबियांचा जीव वाचवला. ज्या लोकांनी क्षीरसागर यांच्या कुटुंबियांचा जीव वाचावला त्यांचा सत्कार भुजबळांनी आज केला.

त्यानंतर आंदोलकांवर घणाघात केला. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात सगळी मंडळी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे पाहिले चित्र मुस्लिम समाजातील व्यक्तीने तयार केले. पण क्षीरसागर यांच्या घराला जेव्हा आग लावली तेव्हा जय शिवाजी, जय जिजाऊ म्हणत आग लावत होते. छत्रपती शिवरायांचे नाव घेता अन आपल्याच लोकांना असं करतात का सवाल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात एका संशयताला SIT ने घेतले ताब्यात

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

केतनच्या हत्येमागचं डिजिटल कनेक्शन उघड, गुगलवर शोधले पर्याय, लोहगडावर सराव

SCROLL FOR NEXT