Eknath Shinde News: शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर वेग मर्यादा आणि नियमांचे पालन करा; CM शिंदे यांचं आवाहन

CM Eknath Shinde latest News: अटल सेतू आजपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मात्र, त्यानंतर वाहनचालकांनी या सेतूवरून प्रवासाचा आनंद घेताना वेग मर्यादा आणि नियमांचे पालन करावे, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
eknath shinde news
eknath shinde news saam tv
Published On

CM Eknath Shinde on Mumbai Trans Harbour Link:

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल शुक्रवारी 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावाशेवा अटल सेतू’ चे लोकार्पण केलं. अटल सेतू आजपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मात्र, त्यानंतर वाहनचालकांनी या सेतूवरून प्रवासाचा आनंद घेताना वेग मर्यादा आणि नियमांचे पालन करावे, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भारतातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू अशी या सेतूची ओळख आहे. यामुळे, दाक्षिण भारतासह, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोवा यांचे अंतर कमी होणार आहे. हा सेतू एक देशातील एक प्रमुख अभियांत्रिकी आविष्कार ठरला आहे. या सेतूवरून प्रवास करणे हा आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाचा क्षण असणार आहे, हा क्षण अनुभवताना वाहन वेग मर्यादा लक्षात घेऊन सुरक्षितपणे प्रवास करावा'. या सेतूवर सुरक्षित आणि आनंददायी प्रवास करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

eknath shinde news
Uddhav Thackeray: 'शाखा पळवलीत, आमचं सरकार येऊ देत मग...', शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडली

'अटल' सेतूवर वाहनाला किती टोल भरावा लागेल?

अटल सेतूसाठी १७,८४० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या सेतूवरू प्रवास करण्यासाठी वाहनांच्या प्रकारानुसार टोल भरावा लागणार आहे. या सेतूवर प्रवास करण्यासाठी २५० रुपये ते कमाल १५८० रुपये टोल एकाबाजूने भरावा लागणार आहे. महिना टोल पाससाठी १२५०० ते ७९००० रुपये मोजावे लागणार आहेत.

eknath shinde news
Ram Mandir: मी राम मंदिरात गेल्यानंतर मंदिराचा निकाल लागला: उद्धव ठाकरे

'अटल' सेतूवर वाहनांनुसार टोल

कार

एका बाजूने - २५०

दोन्ही बाजूने - ३७५

एकदिवसीय पास -६२५

मासिक पास -१२५००

मिनिबस

एका बाजूने - ४००

दोन्ही बाजूने - ६००

एकदिवसीय पास - १००

मासिक पास - २००००

बस/ट्रक (२ अॅक्सेल)

एका बाजूने - ८३०

दोन्ही बाजूने - १२४५

एकदिवसीय पास - २०७५

मासिक पास -४१५००

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com