Chandrashekhar Bawankule, Kolhapur News, Eknath Shinde, Devendra Fadnavis saam tv
महाराष्ट्र

Maharashtra CM : ...तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील, आम्ही ते मान्य करु : चंद्रशेखर बावनकुळे (पाहा व्हिडिओ)

सोशल मीडियावर जाणीवपूर्वक भाजप विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बावनकुळेंनी स्पष्ट केले.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. भाजपच्या नेत्यांना वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) व्हावेत असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काेल्हापूरात नमूद केले. दरम्यान आमच्या केंद्रीय समितीने जर सांगितले की पुढेही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (cm eknath shinde) राहतील तर आम्हांला काम करावे लागेल असेही बावनकुळेंनी स्पष्ट केले. (Maharashtra News)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काेल्हापूरात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले महाराष्ट्रात लोकसभा प्रवास उपक्रम सुरू केला आहे. लोकसभेच्या 45+ जागा जिंकण्यासाठी हा आमचा उपक्रम आहे. संपर्क ते समर्थन असा आमचा प्रवास आहे. जनता आम्हांला समर्थन देत आहे याचं समाधान आहे असेही बावनकुळेंनी नमूद केले.

बावनकुळे म्हणाले निवडणूक जवळ येईल तसे आम्हांला आणखी समर्थन मिळेल आणि आमचा विजय होईल. 1 हजार लोकांना भेटल्यानंतर दोन ते तीन लोक इंडिया आघाडीला मत देऊ म्हणतात. सोशल मीडियावर जाणीवपूर्वक भाजप विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्याची फारशी चिंता नाही

चुकीच्या पद्धतीने तयार केलेलं ग्राफिक्स लोकांना समजते, त्यामुळं त्याची फारशी चिंता नाही असेही बावनकुळेंनी स्पष्ट केले. ते म्हणाले जनतेला खरं काय आणि खोटं काय आहे हे कळतं. एका लोकसभेत व्हाट्सएपचे 1200 ग्रुप तयार करून जनतेपर्यंत जाणार आहोत. जनतेला विश्वासात घेऊन सरकार निर्णय घेईल, जनतेला विश्वासात न घेता निर्णय घेता येत नाहीत असेही त्यांनी नमूद केले.

जो पक्ष सांभाळेल त्यांच्यासोबत नेते जातील

शेकापचे जयंत पाटील यांच्यावर पक्ष शोधण्याची वेळ आली आहे. शरद पवार यांच्याकडे आता पक्ष राहिलेला नाही. अजित पवार यांना आणखी समर्थन मिळेल. जो पक्ष सांभाळेल त्यांच्यासोबत नेते जातील. उद्धव ठाकरेंनी काही दिले नाही. आज एकनाथ शिंदे देतात तर नेते त्यांच्याबरोबर राहतील असे एका प्रश्नावर उत्तर देताना बावनकुळेंनी नमूद केले.

हसन मुश्रीफांवर कारवाई ?

हसन मुश्रीफ (hasan mushrif guardian minister of kolhapur) यांची कारवाई कुठपर्यंत आली आहे हे मला माहिती नाही. पण मला वाटतं त्यांच्यावरची कारवाई मागे घेतलेली नाही अशी माहिती बावनकुळेंनी माध्यमांना दिली. आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला तर केंद्र आणि राज्य सरकारला कळवले जाईल. महाराष्ट्राला अडचण निर्माण होईल अशी उंची धरणाची वाढवू नये असे वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शरद पवार (sharad pawar) यांनी नरेंद्र मोदी यांना देखील बारामतीला बोलवले होते, पण त्याचा पवार यांना फारसा उपयोग झाला नाही. आता देखील राहुल गांधी यांना बारामतीला आणले तरी फारसा उपयोग होणार नाही असे म्हटले.

दरम्यान मित्र पक्षांमध्ये भाजप हा बॉस नसून जेष्ठत्वाची भूमिका पार पाडेल असेही बावनकुळेंनी फडणवीस की शिंदे मुख्यमंत्री या चर्चेवर स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT