Chandrashekhar Bawankule Saam tv
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : संविधान बदलणार या सर्व अफवा; चंद्रशेखर बावनकुळेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

Political News : कर्नाटकमध्ये एका मंत्र्याने संविधान बदलण्यासाठी मतदान द्या, असे विधान केले, याची आठवण काल शरद पवारांनी करून दिली होती. त्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

Ruchika Jadhav

Chandrashekhar Bawankule News :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा पसरवायला सुरूवात केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारही यात सहभागी झाले आहेत. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांसह विरोधकांवर निशाणा साधला आहे.

भारताचे संविधान बदलणे हे कुणालाही शक्य नाही. संविधान अत्यंत मजबूत आहे. शरद पवार ज्या काँग्रेसमध्ये एकेकाळी होते तो काँग्रेस पक्ष सत्तेत असताना घटना दुरुस्तीच्या नावाखाली संविधान कितीदा बदलविण्यात आले? याचा आकडा पवार साहेबांकडे नक्कीच असणार, असंही बावनकुळेंनी यावेळी म्हटलं.

पंतप्रधान नरेंजद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने मागील दहा वर्षात संविधानाचा सन्मानच केला आहे. पंतप्रधान मोदींनी संसद भवनाला संविधान सदन असं नाव दिलं आहे. भाजपने नेहमीच घटनात्मक मूल्य आणि राष्ट्रहितासाठी काम केलं आहे. त्यामुळे जनतेनं कुठल्याही नेत्यांच्या भुलथापांना बळी पडू नये. जय संविधान !, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत केली आहे.

काय म्हणाले होते शरद पवार

काल इंदापूरमध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला. "कर्नाटकमध्ये एका मंत्र्याने संविधान बदलण्यासाठी मतदान द्या, असे विधान केले, याची आठवण काल शरद पवारांनी करून दिली होती.

भाजपच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे. लोकांसाठी सत्ता वापरणं हे लोकशाहीमध्ये गैर नाही, पण सत्तेचा वापर करून संविधानावर हल्ला होण्याची शक्यता असली, तर त्यासाठी सामान्य माणसाने जागरूक राहण्याची आवश्यकता आहे," असे आवाहनही शरद पवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT