Famous Actor Bobby Brown passes away
Famous Actor Bobby Brown passes awaySaam Tv

Actor Death: घरात लागलेल्या आगीमुळे प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू; मनोरंजन विश्वात मोठा धक्का

Actor Death: ‘द वायर’ या गाजलेल्या मालिकेतून ओळख मिळवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले. घरी लागलेल्या आगीतील धुरात गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Published on

Actor Death: अमेरिकन अभिनेते बॉबी जे. ब्राउन यांचे 62 वयात निधन झाले आहे. त्यांच्या घरात लागलेल्या भीषण आगीत अडकल्यामुळे त्यांना श्वासास घेण्यास त्रास झाला त्यामुळे त्यांचे प्राण गमावले. ही घटना 24 फेब्रुवारी 2026 रोजी चॅप्टिको, मेरीलँड मध्ये त्यांच्या घरातील गॅराजमध्ये घडली. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांनी या 5 सीझनमधील 12 भागांमध्ये काम केले. ही घटना घडली तेव्हा बॉबी ब्राउन गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत होते. पण अचानक आग अधिक भडकली. त्यांनी आग मदतीसाठी कुटुंबियांना आग्निशमन दलाला बोलावलं, परंतु पोलीस आणि अग्निशमन दल घटना स्थळी पोहोचेपर्यंत धूरामुळे त्यांचा मृत्यू झालेला असल्याचे मेरीलँड मेडिकल रिसर्चने सांगितले.

Famous Actor Bobby Brown passes away
Influencers Harassed in Mumbai: बिहारींनी लाज काढली! विदेशी क्रिएटरसोबत भररस्त्यात अश्लील कृत्य, मुंबई पोलिसांनी शिकवला धडा

यावेळी त्यांची मदत करताना त्यांच्या पत्नीचेही हात भाजले आणि त्यांना गंभीर जखमा झाल्या त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे असे बॉबी ब्राउन यांंच्या मुलीने टीएमझेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

Famous Actor Bobby Brown passes away
Govinda: 'गोविंदाचं करियर यामुळे खराब झालं...'; या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

ब्राउन हे जगभरात सर्वाधिक प्रसिद्ध HBO ची टेलिव्हिजन सीरिज “द वायर” मध्ये ऑफीसर बॉबी ब्राउन या भूमिकेसाठी ओळखले जात होते. ब्राउन फक्त “द वायर” मध्येच नव्हे तर 'Law & Order: SVU', 'We Own This City' आणि इतर टीव्ही आणि चित्रपटांमध्येही दिसले आहेत. बॉबी जे. ब्राउन यांच्या मृत्यूने त्यांच्या फॅन्स, सहकारी आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com