Chandrapur Party Saam Tv
महाराष्ट्र

Chandrapur: शासकीय इमारतीत रंगली दारू पार्टी, जिल्हा परिषद अभियंत्यांचा प्रताप; पाहा VIDEO

Chandrapur Party: चंद्रपूरमध्ये शासकीय इमारतीमध्ये दारू पार्टी रंगली. जिल्हा परिषद अभियंत्यांच्या या पार्टीचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्याची जिल्हाभर जोरदार चर्चा रंगली आहे.

Priya More

Summary -

  • चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये अभियंत्यांनी शासकीय विश्रामगृहात दारू पार्टी करत असताना पकडले गेले.

  • ही घटना वसंत भवन या सरकारी निवासस्थानी घडली.

  • याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही गोष्ट उघडकीस आणला.

चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेमध्ये अभियंत्यांची ओली पार्टी रंगली होती. या अभियंत्यांना पार्टी करताना रंगेहाथ पकडले. शासकीय इमारतीमध्ये ही पार्टी रंगली होती. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. आम आदमी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही मोहीम फत्ते केली. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हे पाच सहा अभियंते जिल्हा परिषदेच्या वसंत भवन या शासकीय विश्रामगृहात ओली पार्टी करीत असल्याची माहिती आपच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यावरून त्यांनी वसंत भवनच्या खोली क्रमांक १०७ मध्ये जाऊन बघितले असता याठिकाणी जंगी दारु पार्टी रंगल्याचे दिसून आले. वसंत भवन ही वस्तू जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे निवासस्थान आहे. सरकारी मालमत्ता आहे. अशा शासकीय इमारतीत हे अभियंते दारू ढोसत असल्याने ते गैर ठरले.

आपच्या पदाधिकाऱ्यांनी हा संपूर्ण प्रकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगून घटनास्थळी येण्याची मागणी केली. मात्र त्यांनी व्हॉट्सॲपवर माहिती पाठवा, असे सांगत येणे टाळले, अशी माहिती आपने दिली. दरम्यान यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते देखील उपलब्ध होऊ शकले नाही. सध्या या घटनेची जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

Jio Special Offer: जिओचा डबल धमाका! एका प्लॅनसोबत दुसरा प्लॅन फ्री, काय आहे ऑफर जाणून घ्या

Maharashtra Live News Update: नगरपरिषद आणि नगरपंचायत आचारसंहिता घोषित झाल्यानंतर आशिष शेलार मुंबईच्या दिशेने रवाना

रायगडनंतर नंदुरबारमध्येही महायुतीत राडा; शिवसेना-भाजपात तेढ,भाजप आमदाराला सेनेशी युती आवडेना

SCROLL FOR NEXT