Road Accident Saam Tv
महाराष्ट्र

Chandrapur Road Accident: गौतमी पाटीलचा कार्यक्रम पाहायला गेले अन् परतताना नियतीनं डाव साधला; अपघातात २ तरुणांचा मृत्यू

संजय तुमराम

Chandrapur Accident News:

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलची संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता वाढली आहे. गौतमी तिच्या नृत्य आणि कार्यक्रमातील चाहत्यांच्या गोंधळामुळे नेहमीच चर्चेत असते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. याच गौतमीच्या नृत्याच्या कार्यक्रमानंतर घरी परतत असताना दुचाकी आणि ट्रॅक्टरचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दोघे जण ठार झाल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील व्याहाळ खुर्द येथे प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला गौतमीच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम झाल्यानंतर गावात परत जाणाऱ्या युवकांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोलीतील मोखाळा येथे अपघात झाला आहे.

भरधाव दुचाकी ट्रॅक्टरला आदळल्याने अपघात झाला आहे. या अपघातात हरी सहारे आणि जयेश महाडोले हे तरुण जागीच ठार झाले आहेत. तर आकाश मोहरुले हा युवक जखमी झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमका अपघात कसा झाला?

गडचिरोलीतील मोखाळा येथील कमलाई महाविद्यालयासमोर हा अपघात झाला आहे. भरधाव दुचाकीने ट्रकला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात यश हरी सहारे(१७), जयेश महाडोळे (२६) या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

तर या अपघातात आकाश नावाचा तरुण जखमी झाला आहे. या तरुणांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर दोन्ही तरुणांच्या जाण्याने त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे.

कोयता गँगच्या म्हाेरक्यासह त्याच्या मित्राचा अपघातात मृत्यू

पुण्यातील कोयता गँगता म्होरक्या गणेश उर्फ दादा विठ्ठल हवालदार आणि त्याचा मित्राचा अपघातात मृत्यू झाला आहे. पुण्यातील लोणीकाळभोरच्या एच.पी.टर्मीनलजवळ ट्रक आणि दुचाकी यांच्यात मध्यरात्री एक अपघात झाला होता. या अपघातात दोघे ठार झाले. दुचाकीवरुन लोणीकाळभोरकडे जाताना या दोघांचा अपघात झाला आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT