Kalyan Crime: कुटुंबीय गरबा खेळायला गेले अन् वॉचमनने डाव साधला, कल्याणमधील प्रकाराने खळबळ

Kalyan Latest News: एकूण 35 लाख 88 हजारांचा मुद्देमाल घेवून हा चोर नेपाळला फरार झाला असून महात्मा फुले स्टेशनचे पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaamtv
Published On

अभिजित देशमुख, प्रतिनिधी

Kalyan Crime News:

गरबा खेळण्यासाठी गेलेल्या कुटूंबाच्या घरात वॉचमननेच डल्ला मारल्याची धक्कादायक घटना कल्याणमधून समोर आली आहे. घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कमेसह एकूण 35 लाख 88 हजारांचा मुद्देमाल घेवून हा चोर नेपाळला फरार झाला असून महात्मा फुले स्टेशनचे पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.

सर्वत्र नवरात्रोत्सवाचा (Navratri Utsav 2023) उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळत आहे. सर्वत्र गरबा दांडियाच्या कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत असतानाच कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणमध्ये गरबा खेळण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मिळून 35 लाख 88 हजाराचा मुद्देमान लंपास केल्याचे उघडकीस आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या इमारतीचा वॉचमन गगन बहादूर व त्याची पत्नी सुमन बहादूर यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. घटनेनंतर हे दोघे पती-पत्नी नेपाळ पळून गेल्याची माहितीही समोर आली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Crime News
Nandurbar News: पतीच्या निधनानंतर एकटीने संसार फुलवला.. अशिक्षित माऊलीने १० मुलांना उच्चशिक्षित केलं; तीन लेक निष्णांत डॉक्टर

कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरातील उमा दर्शन सोसायटीमध्ये राहणारे पटेल कुटुंबीय काल गरबा खेळण्यासाठी शहाड पाटीदार भवन येथे गेले होते. गरबा खेळून घरी परतल्यानंतर त्यांना घरातील दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस तपासामध्ये याबाबत खळबळजनक माहिती समोर आली.

ज्यामध्ये या इमारतीत वॉचमन म्हणून काम करणारे गगन बहादुर व त्याची पत्नी सुमन बहादूर यांनी आपल्या दोन साथीदारांच्या न पटेल यांच्या घरी चोरी केल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनी बेडरूममधील कपाट फोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा मिळून 35 लाख 88 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तसेच हे पती-पत्नी नेपाळला पळाल्याचेही पोलीस तपासात समोर आले असून सध्या त्यांचा शोध सुरू आहे. (Latest Marathi News)

Kalyan Crime News
Bike On Rent ला रिक्षा चालकांचा विराेध, व्यवसाय बंद ठेवत अलिबाग पाेलीस ठाण्यावर काढला धडक माेर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com