Nandurbar News: पतीच्या निधनानंतर एकटीने संसार फुलवला.. अशिक्षित माऊलीने १० मुलांना उच्चशिक्षित केलं; तीन लेक निष्णांत डॉक्टर

Nandurbar Latest News: काळ्यामातीशी नाळ जुडलेली ही माता अनेक आदिवासी महिलांसाठी आदर्श ठरत आहे.
Nandurbar News
Nandurbar NewsSaamtv
Published On

सागर निकवाडे, प्रतिनिधी

Nandurbar News:

आईला संघर्षाचे विद्यापीठ म्हणले जाते. आपल्या लेकरांच्या यशासाठी, उज्वल भविष्यासाठी रात्रंदिवस राबणारी आपली आई असते. नंदुरबार जिल्ह्यातील एका आदिवासी मातेने आपल्या एक दोन नव्हे तर तब्बल दहा लेकरांना प्रतिकुल परिस्थितीमध्ये शिकवत तिघांना डॉक्टर बनवले. काळ्यामातीशी नाळ जुडलेली ही माता अनेक आदिवासी महिलांसाठी आदर्श ठरत आहे. काय आहे या माऊलीच्या संघर्षाची कहाणी, जाणून घेवू.

नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेल्या उमराणी गावात राहणाऱ्या जेबलीबाई पावरा यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करत आपल्या संसाराचा मळा फुलवला आहे. नवऱ्याच्या अचानक मृत्युनंतर आपल्या एक दोन नव्हे तर दहा मुलांच्या संसाराचा गाडा त्यांनी सर्व मुलांना उच्चशिक्षित बनवले.

जेबली बाई पावरा यांच्या 6 मुलींपैकी 5 मुलींचे लग्न झाले आहे. तसेच त्यांच्या ४ मुलांपैकी तिघांचे लग्न झाले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या चार मुलामंधील तीन मुले आज डॉक्टर झाली आहेत. संघर्ष आणि शिक्षणाचे महत्व ओळखल्यानेच शेतातल्या पाण्याच्या पाईपांना जॉईंट देणाऱ्या 62 वर्षीय जेबलीबाई पावरा जिल्ह्यातल्या पहिल्या जॉईट रिप्लेसमेट सर्जन डॉ. सुनिल पावरा यांच्या माता ठरल्या आहेत.

Nandurbar News
Nitin Gadkari News: मुंबई-गोवा महामार्ग का झाला नाही? ; नितीन गडकरींनी नेमकं कारण सांगितलं, जबाबदारीही घेतली

स्वत: अशिक्षित असलेल्या जेबलीबाई यांनी शिक्षणाचे महत्व ओळखत मुलांना उच्चशिक्षित केले. आज त्यांचा एक मुलगा जिल्ह्यातील पहिला जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन ठरला आहे. तर दुसरा मुलगा जे.जे वैद्यकीय महाविद्यालयात आणि तिसरा कुपर रुग्णालयात कार्यरत आहे.

शेतीत फुलवलेली भाजी पिकवून तिला विकून त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाचे ब्रम्हास्त्र पेलले. मात्र मुले शिकली सवरली तरी आजही हातात विळा घेवून शेतात न चुकता काम करताना दिसतात. आईला या वयात कष्ट करताना पाहून त्यांची उच्चशिक्षित मुले देखील तिला गावाकडे आल्यानंतर शेतात मदतीसाठी कधीच मागेपुढे पाहत नाहीत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar News
Mumbai News: 'रावण दहन आदल्यादिवशीच घ्या..' सरकारच्या आदेशावर कॉंग्रेसचा संताप; CM शिंदेंना धाडले पत्र

आदिवासी महिलांसाठी ठरतेय आदर्श...

चुल आणि मुल या संकल्पनेत अडकून न राहता स्वत:च्या मुलांना आणि सुनांना स्वयंपुर्ण करणाऱ्या जेबलीबाई यांचा परिवार आज नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने आदर्शच म्हणावा लागेल.

राज्यात शिक्षणात सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबारमध्ये अशा काही अशिक्षित जेबलीबाई पुढे येवून त्यांनी जर समाजासाठी स्वत:च्या परिवाराच्या परिवर्तनासाठी कंबर कसली तर या आधुनिक रणरागिनी आदिवासी समाजाचा चेहरा मोहरा बदलतील यात काही शंका नाही. (Latest Marathi News)

Nandurbar News
Bike On Rent ला रिक्षा चालकांचा विराेध, व्यवसाय बंद ठेवत अलिबाग पाेलीस ठाण्यावर काढला धडक माेर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com