Mumbai News: 'रावण दहन आदल्यादिवशीच घ्या..' सरकारच्या आदेशावर कॉंग्रेसचा संताप; CM शिंदेंना धाडले पत्र

Shivsena Dasara Melava 2023: आझाद मैदानावर दरवर्षी दसऱ्याला होणारा रावण दहनाचा कार्यक्रम एक दिवस आधी घ्या.. असे फर्मान काढल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Mumbai News
Mumbai NewsSaamtv

Mumbai News:

मैदानांचा वाद मिटल्यानंतर आता शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावर होत आहे, तर शिंदे गटाचा मेळावा हा आझाद मैदानावर होत आहे. मात्र दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदानावर होणारा रावण दहन एक दिवस आधी घ्या.. असे फर्मान काढल्याने नव्या वादाला तोंड फुटले असून याप्रकरणी मुंबई कॉंग्रेसने संताप व्यक्त केला आहे.

शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा हा आझाद मैदानावर होत आहे. या मैदानावर दसऱ्याला दरवर्षी रावनदहन केले जाते. महाराष्ट्र रामलीला मंडळ आणि साहित्य कलामंडळाकडून गेल्या ४८ वर्षांपासून हा रावणदहनाचा कार्यक्रम केला जातो. मात्र याच मैदानावर शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा होत असल्याने हा कार्यक्रम आदल्या दिवशी म्हणजेच नवमीलाच घ्या.. असे आदेश सरकारने दिले आहेत.

या निर्णयावर कॉंग्रेसकडून (Congress) संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई कॉंग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी या निर्णयाविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. हा भारतीय संस्कृती आणि लोकांच्या श्रद्धेसोबत खेळ आहे, असं म्हणत निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. (Maharashtra Politics)

Mumbai News
Raj Thackeray News: 'वाजपेयींच्या सुरक्षारक्षकाने चक्क ताज हॅाटेल झाकायला सांगितले...' राज ठाकरेंनी सांगितला अजब प्रसंग

"रामलीला हा लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. गेली ४८ वर्ष रामलेलेची ही परंपरा अखंड आहे. आता केवळ शुल्लक राजकीय हेतुसाठी तुम्ही त्यात हस्तक्षेप करुन लोकांच्या भावना दुखावत आहात, हा भारतीय संस्कृतीचा आणि लोकांच्या श्रध्देचा अपमान आहे, आणि आम्ही हे कधीच सहन करणार नाही.." असा इशारा वर्षा गायकवाड यांनी या पत्रातून दिला आहे. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai News
Pune Crime News : पुण्यातील कोयता गँगच्या म्हाेरक्यासह मित्र ठार, पाेलीस तपास सुरु

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com