Nitin Gadkari News: मुंबई-गोवा महामार्ग का झाला नाही? ; नितीन गडकरींनी नेमकं कारण सांगितलं, जबाबदारीही घेतली

Nitin Gadkari : गेल्या १७ वर्षापासून मुंबई-गोवा महामार्ग का झाला नाही? या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिलं.
Nitin Gadkari
Nitin Gadkari Saam Tv

Nitin Gadkari On Mumbai Goa highway:

'मनातले गडकरी' या सदराखाली अभिनेते प्रशांत दामले यांनी नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग का झाला नाही याचं नेमकं कारण सांगितलं. (Latest News)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरून राज ठाकरेंनी केंद्रीय मंत्री गडकरींवर टीका केली होती. गेल्या १७ वर्षापासून मुंबई-गोवा महामार्ग का झाला नाही? या प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली होती. नितीन गडकरी हे त्यावेळी पीडब्लूडी मिनिस्टर होते. त्यांच्या पुढाकाराने मुंबई-पुणे रस्ता झाला. त्यावेळी आपल्या देशाला कळलं, असा रस्ता होऊ शकतो आणि मग देशात चांगले रस्ते व्हायला सुरुवात झाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्या महाराष्ट्राने हा आदर्श घालून दिला, त्याच महाराष्ट्रातील मुंबई-गोवा रस्ता हा असा आहे.' असं म्हणत राज ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर हल्लाबोल केला होता. दरम्यान मुंबई-गोवा महामार्ग का झाला नाही, याचे उत्तर आज नितीन गडकरी यांनी सकाळ वृत्तसमुहाच्या कॉफी टेबल कार्यक्रमातील 'मनातले गडकरी' या सदरखाली झालेल्या मुलाखतीत दिलं.

मुंबई-गोवा महामार्ग रखडल्याला मीच जबाबदार आहे, अशी गडकरींनी दिली. परंतु या कामात किती अडचणी आल्या याचीही माहिती त्यांनी दिली. मुलाखतकार प्रशांत दामले गडकरींना प्रश्न केला की, "तुमच्याबाबतीत म्हटलं जातं की, एखादं काम होणार असेल होणार आणि होणार नसेल तर होणार नाही. तुम्ही एकदा ठरवले की हे करायचे तर करणार नाहीतर नाही होणार मग २०१४ पासून २०२३पर्यंत मुंबई गोवा महामार्ग का झाला नाही?

यावर गडकरी म्हणाले की, " हा महामार्ग झाला नाही तर त्याला मीच जबाबदार आहे. याची जबाबदारी मी दुसऱ्यावर ढकलंत नाही. कोकणातील नदीवरील पूल वाहून गेला, त्यानंतर तो आम्ही ८-९ महिन्यात पूर्ण केला. खरं म्हणजे हा महामार्ग जर आधीच पूर्ण झाला असता तर हे लोकही मृत्यू पावले नसते.

का आल्या अडचणी

हा महामार्ग हा महाराष्ट्र सरकारकडे दिला होता. त्यावेळी छगन भुजबळ मंत्री असताना त्यांनी टेंडर काढून याची कामे दिली. त्यातले कॉन्ट्रॅक्टर बदलले, पुरेशा अडचणी आल्या. जमीन अधिग्रहणाला अजूनही अडचणी येत आहेत. पण ज्या काही अडचणी आणि समस्या आल्या असतील त्याला जबाबदार आहे, त्यासाठी मी कोणालाही जबाबदार धरत नाही.

या रस्त्यासाठी मी माझ्या आयुष्यात सर्वाधिक बैठका घेतल्या. ज्याप्रमाणे प्रशांत दामले तुम्ही १२५०० नाटकाचे प्रयोग केलेत. तसेच मी रेकॉर्ड ब्रेक जवळपास ७५ ते ८० बैठका झाल्या असतील तरीही मला यश मिळालं नाही. पण यावर्षी डिसेंबर महिन्याच्या आत हा मुंबई-गोवा रस्ता पूर्ण होईल, असं गडकरी यावेळी म्हणाले.

Nitin Gadkari
Nitin Gadkari : खाली हाथ आया, खाली हाथ जाएगा!... नितीन गडकरींनी दिला आनंदी राहण्याचा मंत्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com