शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे. सचिन मेटे असे त्यांच्या पुतण्याचे नाव असून बीडच्या राजेगाव परिसरात त्यांनी गळफास घेत आपले आयुष्य संपवले. या आत्महत्येमागील कारण समोर आले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे (Vinayak Mete) यांच्या 34 वर्षीय पुतण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सचिन मेटे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून बीडच्या (Beed) राजेगाव परिसरात त्याने गळफास घेवून आपले आयुष्य संपवले.
सचिन मेटे हे विनायक मेटे यांचे बंधू त्र्यंबक मेटे यांचे सुपुत्र आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, गेल्यावर्षीच शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. १४ ऑगस्ट २०२२ रोजी विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई- पुणे एक्सप्रेसवर भीषण अपघात झाला होता. यामध्ये विनायक मेटे यांचे दुर्देवी निधन झाले. वर्षभरात घडलेल्या आणखी एका घटनेने मेटे कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.