Congress leaders Vijay Waddettiwar and Pratibha Dhanorkar amid the Chandrapur mayor post controversy. saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Politics: वडेट्टीवार आणि धानोरकर वाद शिगेला,18 नगरसेवक दिल्लीला; महापौरपदाबाबत अंतिम निर्णय घेणार राहुल गांधी?

Chandrapur Mayor Election: विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत कलहामुळे चंद्रपूरमध्ये सत्तास्थापना झालीय नाहीये. दिल्लीत १८ नगरसेवक असल्याने महापौरपदाचा निर्णय राहुल गांधी घेतील असं सांगितलं जात आहे.

Bharat Jadhav

  • विजय वडेट्टीवार–प्रतिभा धानोरकर वादामुळे काँग्रेसमध्ये तणाव

  • 18 नगरसेवकांसह वडेट्टीवार दिल्लीला रवाना

  • बहुमत असूनही चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेला अडथळा

काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे चंद्रपूरमधील राजकारणात वादळ उठलंय. येथील माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद आता दिल्ली दरबारी गेलाय. विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या 18 नगरसेवकांसह दिल्ली गाठली आहे. यामुळे चंद्रपुरातील महापौरपदाच्या वादाचा निकाल आता दिल्लीत लागणार अशी चर्चा सुरू झालीय. दरम्यान चंद्रपुरात सर्वात मोठा पक्ष ठरुनही काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे सत्ता स्थापन करण्यात अडथळे निर्माण होत आहे.

चंद्रपुरात काँग्रेसने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या आहेत आणि काँग्रेस समर्थित जनविकास सेनेच्या तीन नगरसेवकांनी त्यांनी पाठिंबा दिलाय. त्यामुळे बहुमतासाठी केवळ चार नगरसेवकांची गरज आहे. इतकं सोप सत्तेचं गणित असतानाही काँग्रेसला सत्ता स्थापन करता येत नाहीये. त्यामागील अडचण ठरलीय विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही हा वाद सोडवण्यात यश आलं नाही. यामुळे महापौरपदावर अंतिम तोडगा निघाला नाहीये. त्यामुळेच विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या १८ समर्थक नगरसेवकांना घेऊन दिल्ली गाठली आहे. विजय वडेट्टीवार हे त्यांच्या नगरसेवकांसह काँग्रेसचे सचिव केसी वेणुगोपाळ यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळालील. त्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला आता या वादामध्ये तोडगा काढता येतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

दरम्यान, वडेट्टीवार-धानोरकर वादाचा फायदा घेऊन सत्ता स्थापन करता येईल का याची भाजपनेही चाचपणी केलीय. भाजपकडे २३ नगरसेवक आहेत. पण त्यांना इतर पक्षांचा पाठिंबा आवश्यक आहे. यात उद्धव ठाकरे गटाचे ६ आणि वंचितच्या दोन नगरसेवकांनी, तसेच अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला ते सत्ता स्थापन करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खोपोली नगर परिषदेचा अनागोंदी कारभार उघड, 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे अर्धनग्न आंदोलन

Wednesday Horoscope : काही तरी मोठं घबाड हाती लागणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब सुसाट धावणार

कोण राज ठाकरे- वाकरे...; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरील टीकेनंतर प्रफुल पटेल भडकले, VIDEO

Valentine's Day Gifts: व्हॅलेंटाईन डे करा स्पेशल यावेळी तुमच्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याला द्या या युनिक गिफ्ट्स

राज्यातील शिक्षकांची निवडणूक ड्युटी रद्द; जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT