विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान NCP नेते प्रफुल पटेलांच्या भेटीगाठी सुरू; PM मोदी, अमित शहांसोबत बंद दाराआड चर्चा

Praful Patel Meets PM Modi and Amit Shah: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय अटकळांना वेग आला आहे.
Praful Patel Meets  PM Modi and Amit Shah:
File Photo | NCP leader Praful Patel’s Delhi meetings with PM Modi and Amit Shah spark political speculation.saam tv
Published On
Summary
  • अजित पवारांच्या निधनानंतर राज्यातील राजकारण वेगाने हालचालीत

  • राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा जोर

  • प्रफुल पटेल यांची पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी बंद दाराआड चर्चा

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकारणात जलद घडामोडी घडत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवरून वादंग सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेलांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली आहे. प्रफुल पटेल यांनी मोदी आणि शाहांची स्वतंत्र भेट घेत त्यांच्याशी पाच ते सहा मिनिटे चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. दरम्यान यांच्यात चर्चा कोणत्या विषयासंदर्भात झाली याचा तपशील समोर आला नाहीये. या तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अजून गुलदस्त्यात आहे.

Praful Patel Meets  PM Modi and Amit Shah:
'NCP विलिनीकरणाविरोधात कट कारस्थान?' विजय वडेट्टीवारांच्या दाव्यानं राज्यात खळबळ

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल पटेल यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर सुनेत्रा पवार देखील पंतप्रधान मोदी, आणि अमित शाह यांची भेट घेणार आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. आज दिल्लीत प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

Praful Patel Meets  PM Modi and Amit Shah:
Sunetra Pawar: विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतला पहिला मोठा निर्णय

सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यानिमित्त एनडीएच्या सर्व खासदारांची एक बैठक घेतली. मोदींनी त्यांना संबोधित केलं. त्यावेळी मोदींनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. खासदारांच्या बैठकीनंतर प्रफुल पटेल हे मोदी आणि अमित शाहांना भेटलेत.

अजित पवार असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी आणि अमित शाहांनी त्याला ग्रीन सिग्नल दिला होता अशी माहिती समोर आली होती. त्याचदरम्यान प्रफुल पटेल यांनी दोन्ही बड्या नेत्यांची भेट घेतलीय. पटेल हे राष्ट्रवादीचे बडे नेते असून केंद्रीय स्तरावरील पक्षाचे निर्णय ते घेतात. त्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची त्यांनी घेतलेल्या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय.

अजित पवारांच्या पश्चात दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की नाही? तसेच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याबाबतही जोरदार चर्चा रंगत आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष असलेल्या प्रफुल पटेलांकडेच हे पद जाणार अशी चर्चा सुरू होती. आता त्यावर प्रफुल पटेलांनी स्पष्टीकरण दिलंय. सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष असतील असे अप्रत्यक्ष संकेत प्रफुल पटेलांनी दिलेत. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही असं प्रफुल पटेल म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com