Chandrapur News Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur News : अवैध धंदे रोखण्यासाठी चकपिरंजी ग्रामसभेत अनोखा ठराव; शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी टाकली अट

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील चकपिरंजी हे गाव सावली तालुक्यात असून चंद्रपूर- गडचिरोली महामार्गावर आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चक पिरंजी या गावात ग्रामसभेने अनोखा ठराव पारित केला आहे. गावात जो कुणी अवैध दारू विक्री आणि धंदे करेल; त्याला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार नसल्याचा ठराव केला आहे. 

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील चकपिरंजी हे गाव सावली तालुक्यात असून चंद्रपूर- गडचिरोली महामार्गावर आहे. या गावात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असून, यामुळे गावकरी त्रस्त आहेत. याबाबत पोलिसात देखील तक्रार देण्यात आली. मात्र कारवाई झाली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी ग्रामसभेत (Gram Sabha) निवेदन देत दारू विक्रीवर आळा घालण्याची मागणी केली. नागरिकांची ही मागणी मान्य करीत ग्रामसभेने कठोर निर्णय घेतला. 

तर अधिकारी. पदाधिकाऱ्यावरही कारवाई 

यात गावातील जो कुणी अवैधरीत्या दारूविक्री करेल, त्याला एकाही शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार नाही. कोणतेही प्रमाणपत्र दिले जाणार नाही. ग्रामसभेच्या या ठरावाविरोधात जर कुणी अधिकारी किंवा पदाधिकाऱ्याने कृत्य केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल; असाही ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. असा ठराव घेणारी जिल्ह्यातील ही पहिलीच ग्राम पंचायत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT