Shivbhojan Thali Saam tv
महाराष्ट्र

Shivbhojan Thali : चंद्रपुरात शिवभोजन योजनेला घरघर; सहा महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने थाळी बंद

Chandrapur News : शिवभोजन केंद्राला सरकारकडून दर महिन्याला अनुदान दिले जात होते. सुरवातीला हि योजना चांगल्या प्रकारे चालली. तसेच केंद्राला अनुदान देखील वेळेवर दिले जात होते.

संजय तुमराम

चंद्रपूर : गरिबांसाठी अल्पदरात भोजन मिळाले या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली होती. याचा चांगला लाभ देखील मिळत होता. मात्र गरिबांसाठी सुरू झालेल्या शिवभोजन थाळी योजनेला चंद्रपुरात घरघर लागली आहे. मागील सहा महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने चंद्रपुरात शिवभोजन थाळी आजपासून बंद करण्यात आली. 

महाविकास आघाडी सरकारने ठिकठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करून या ठिकाणी गरिबांना अल्पदरात पोटभर जेवण मिळू शकेल अशी शिवभोजन थाळी सुरु केली होती. यासाठी शिवभोजन केंद्राला सरकारकडून दर महिन्याला अनुदान दिले जात होते. सुरवातीला हि योजना चांगल्या प्रकारे चालली. तसेच केंद्राला अनुदान देखील वेळेवर दिले जात होते. मात्र अनेक ठिकाणी हे केंद्र बंद पडण्याच्या स्थितीत आले आहेत. अशाच प्रकारे चंद्रपुरात देखील चित्र पाहण्यास मिळत आहे. 

दोन वर्षांपासून अनुदान मिळण्यात अनियमितता 

चंद्रपुरातील बसस्थानक चौकात कैलास चौहान यांचे हॉटेल आहे. योजना सुरू झाल्यापासून त्यांच्याकडे शिवभोजन होते. पण मागील दोन वर्षांपासून अनुदान अनियमित आहे. पण तरीही त्यांनी गोरगरीब लोकांची गरज बघून योजना सुरू ठेवली. थकलेले अनुदान कधी ना कधी मिळेल, या आशेवर ते होते. मात्र मागील सहा महिन्यांपासून अनुदान स्वरूपात सरकारकडून मिळणारा एकही पैसा देखील त्यांना मिळाला नाही. 

अखेर आजपासून थाळी बंद 

सहा महिन्यापासून अनुदान न मिळाल्याने चौहान यांनी अखेर आजपासून ही योजना बंद केली आहे. तशी सूचनाही त्यांनी केंद्राच्या बाहेर लावली आहे. या निर्णयामुळे दररोज इथे भूक भागवायला येणाऱ्या गरजूंची मोठी अडचण झाली. त्याची व्यथा सरकारला पाझर फोडेल काय, हे आता बघावे लागेल. अर्थात शिवभोजन थाळी योजना आता अनेक ठिकाणी बंद पडल्याचे पाहण्यास मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकार अॅक्शन मोडमध्ये, पोलिसांकडून मनोज जरांगेंना नोटीस; रेल्वेकडूनही मराठा आंदोलकांना महत्वाच्या सूचना, वाचा सविस्तर

Manoj jarange patil protest live updates: आम्ही शांततामय मार्गाने दोन वर्षांपासून आंदोलन करतोय- मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणाबात मोठी अपडेट; हैदराबाद गॅझेट लागू होणार, जरांगेंची मागणी मान्य?

ITR Filling: पहिल्यांदा आयटीआर फाइल करताय? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

E20 Petrol: तुमची गाडी E20 पेट्रोलला सपोर्ट करते का हे कसे ओळखाल?

SCROLL FOR NEXT