Chandrapur Petrol Pump Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Petrol Pump : नोटा दिल्या नाही म्हणून गाडीत भरलेले पेट्रोल काढले; पेट्रोल पंपावर दहा रुपयांचे नाणे नाकारले

Chandrapur News : दुचाकीस्वार पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला. पेट्रोल भरल्यानंतर संबंधित व्यक्तीने १० रुपयाचे ९ शिक्के दिले. मात्र, पंपावरील महिला कर्मचाऱ्याने दहा रुपयांचे शिक्के स्वीकारण्यास नकार

संजय तुमराम

चंद्रपूर : चलनात असलेले दहा रुपयांची नाणे घेण्यास नकार देत दुचाकीमध्ये भरलेले पेट्रोल पुन्हा काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये घडला आहे. शहरातील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपावर एका ग्राहकासोबत झालेल्या वादाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

चंद्रपूर शहरातील ताडोबा मार्गावरील बियाणी पेट्रोल पंपावरील हा प्रकार आहे. गाडीतील पेट्रोल संपल्याने एक दुचाकीस्वार या पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला होता. पेट्रोल भरल्यानंतर संबंधित व्यक्तीने १० रुपयाचे ९ शिक्के दिले. मात्र, पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्याने दहा रुपयांचे शिक्के स्वीकारण्यास नकार देत आमच्या पंपावर नाणी चालत नाहीत, फक्त रोकडच स्वीकारली जाते, असे सांगितले. 

नोटा नसल्याने गाडीतून काढले पेट्रोल 

मात्र ग्राहकाकडे नोटा नसल्याने कर्मचाऱ्यांनी त्याच्या वाहनातील संपूर्ण पेट्रोल काढून टाकले. पंपावर घडलेल्या या प्रकारचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून पंप व्यवस्थापनाच्या या अडेलतट्टू धोरणाविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

कारवाईची होतेय मागणी 

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार देशातील कोणतेही वैध नाणे किंवा नोटा स्वीकारण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही. मात्र, बियाणी पेट्रोल पंपावर हा नियम पाळला जात नसल्याचे घडल्या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर नागरिकांनी पेट्रोल पंप मालकावर कारवाई करण्याची आणि संबंधित पंप बंद करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

३ सीनिअर अधिकारी, २० पोलीस अन् गाड्यांचा ताफा; माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी मुंबईकडे मोठा फौजफाटा | VIDEO

Success Story : वडिलांचं छत्र हरपलं, मजुरी करणाऱ्या आईचं पाठबळ; आता घेतलीय वैश्विक भरारी, गोल्डन गर्ल श्वेताची प्रेरणादायी झेप

Mumbai Traffic Alert: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दीड तासापासून वाहतूक कोंडी|Video Viral

Maharashtra Live News Update: गेवराई शहरातील महाविद्यालयीन तरूणी अपहरण प्रकरणात पोलिसांना यश

ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, प्रमुख नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT