Chandrapur News Saam tv
महाराष्ट्र

Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू; चिंचाळा परिसरातील घटना

Chandrapur News : सदर घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळताच वन पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला

संजय तुमराम

चंद्रपूर : जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर वाघाने अचानक हल्ला केला. यात गुराख्याच्या मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात चिंचाळा परिसरात घडली. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली आहे. 

मुनीम गोरलावार (वय ४५) असे मृत झालेल्या गुराख्याचे नाव आहे. मुनीर हा गावाशेजारी लागून असलेल्या जंगलात गुरे राखण्याकरिता गेला होता. यावेळी (Tiger Attack) वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला केला. यात तो जागीच मृत्यू झाला. या परिसरात आलेल्या एका जणाला मुनीर याचा मृतदेह आढळून आला. यानंतर गावात घटनेची माहिती मिळाली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेबाबत वन विभाग (Forest department) व पोलिसांना माहिती दिली.   

सदर घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळताच वन पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. तर वाघाने केलेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे गाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वाघाचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी आता गावकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पसंती, १३७ आमदारांचा पाठिंबा

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस हे आज सायंकाळी दिल्लीला जाणार

Pravin Tayade News : वरिष्ठांनी दाखवलेल्या विश्वासाचं सोनं झालं; बच्चू कडुंचा पराभव करणाऱ्या तायडेंनी व्यक्त केल्या भावना

Ram Shinde: कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो..., राम शिंदेंचे थेट अजित पवारांवर गंभीर आरोप

Maharashtra Politics: मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात बिहार पॅटर्न, एकनाथ शिंदेंना पुन्हा संधी, काय आहेत कारणं?

SCROLL FOR NEXT