Chandrapur  Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur : आई कामावर, मुलगी गेली पेपरला; बंद घरात घडले भयंकर, संसाराची राखरांगोळी

Chandrapur News : नागरिकांनी आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला दिल्यावर अर्ध्या तासानंतर अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत घरातील सर्व सामान जळून राख झाले होते. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले

संजय तुमराम

चंद्रपूर : घरात कोणी नसताना दुपारच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे घराला लागलेल्या आगीत घर बेचिराख झाले असून संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. सदरची घटना चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेटजवळ असलेल्या एका बंद घरात घडली आहे. स्फोट झाला यावेळी सुदैवाने घरात कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेटजवळ गर्ल्स कॉलेजच्या समोर असलेल्या संगीता हांडे यांचे हे घर आहे. संगीता हांडे यांची मुलगी बारावीला असल्याने सध्या तिची परीक्षा सुरु आहे. आज देखील पेपर असल्याने संगीत हांडे यांनी घरातील सर्व कामे आवरली. यावेळी मुलगी पेपर देण्यासाठी घरातून निघाली. या पाठोपाठ संगीता या देखील घराला कुलूप लावून कामासाठी बाहेर पडल्या होत्या. याच वेळी सदरची घटना घडली. 

घरातून धूर निघत असल्याने उडाली धावपळ 

दरम्यान घर बंद असताना सिलेंडरमधून गॅस लीक होऊन स्फोट झाला. यामुळे घराला आग लागली होती. दरम्यान आजूबाजूच्या लोकांना घरातून धूर निघत असल्याचे दिसून आले. यानंतर परिसरातील नागरिकांनी आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला दिल्यावर अर्ध्या तासानंतर अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत घरातील सर्व सामान जळून राख झाले होते. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. 

संसारोपयोगी साहित्य जाळून खाक 

गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घर जळून राख झाले. या गरीब महिलेच्या घरातील संपूर्ण साहित्य जळाले असून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहेत. सुदैवाने आग लागली तेव्हा महिला कामावर गेली होती. तर मुलगी पेपर द्यायला गेली होती. यामुळे सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT