सागर निकवाडे
नंदुरबार : शहादा तालुक्यातील लोहारा गावातील एका शेतकऱ्याच्या गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात एकच धावपळ उडाली होती. या आगीच्या घटनेत गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य संपूर्णपणे जळून खाक झाले असून गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी होरपळून जखमी झाल्या आहेत. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लोहारा या गावातील रामभाऊ ओंकार माळी या शेतकऱ्याने गुरांसाठी व साहित्य ठेवण्यासाठी बांधलेल्या गोठ्याला सकाळी अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी जात आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीवर लवकर नियंत्रण मिळविण्यास यश मिळाले नाही. दरम्यान सरपंच, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल दोन ते तीन तासात आग आटोक्यात आण्यात आली.
अग्निशमनची गाडी येण्यास उशीर
आगीची माहिती अग्निशमन विभागाला कळविण्यात आली. मात्र गाडी पोहचण्यास उशीर झाला. शहादा ते लोहारा गावाचे अंतर फक्त पंधरा मिनीटांचे असून गावकरीनी अग्निशामक दलाची गाडीसाठी संपर्क केला असता गाडी तब्बल दोन तास उशिराने आली. यामुळे अग्निशमन दलाचा कार्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होतो? तोपर्यंत गावकरीनी आग आटोक्यात आणली होती, अग्निशामक दलाची गाडीत फक्त अर्धीच भरलेली होती. अग्निशामक गाडी उशीरा आल्याने गावातील नागरिकांनी रोष व्यक्त केला.
शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
गोठ्याला लागलेल्या या आगीत पाईप तसेच शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. यात साधारण सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच आगीत दोन म्हशी जखमी झाल्या आहेत. तर गोठ्याच्या शेजारील विनोद सरदार पवार, कैलास सरदार पवार यांच्या घरालाही आग लागल्याने त्यांचेही लाखोंचे नुकसान झाले आहे. पोलीस प्रशासन व महसूल विभाग घटना स्थळीचा पंचनामा केला असून शेतकरी व गरीब कुटुंबानी लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.