Chandrapur News Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur News : पेट्रोल पंपावर कार्यकर्त्यांना पैशांचे वाटप; भद्रावती येथील प्रकार, पोलिसांनी टाकली धाड

Chandrapur News : भद्रावती शहर हे वरोरा विधानसभा क्षेत्रात येत असून महत्वाचा तालुका आहे. त्यामुळे राजकीय पक्ष येथे पैशांचा मारा करीत आहेत.

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे एका पेट्रोल पंपावर कार्यकर्त्यांना पैसे वाटप होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी पोलिसांनी धाड टाकून पैसे जप्त केले आहेत. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

भद्रावती शहर हे वरोरा विधानसभा क्षेत्रात येत असून महत्वाचा तालुका आहे. त्यामुळे राजकीय पक्ष येथे पैशांचा मारा करीत (Chandrapur) आहेत. अशाच प्रकारे पैशांचे वाटप केले जात असल्याची माहिती स्थिर निगरानी पथकाला मिळाली. यानुसार भद्रावती शहरातील नागपूर मार्गावर सेलिब्रेशन सभागृहालगत असलेल्या पेट्रोल पंपावर एका उमेदवाराचे पैसे वाटप सुरू होते. ही माहिती मिळताच (Police) पोलीस पथकाने पैसे वाटप होत असलेल्या ठिकाणी धाड टाकली. पोलीस येईपर्यंत मोठी रक्कम वाटून झाली होती. पोलिसांच्या हाती केवळ पन्नास हजार रुपये लागले. 

दोन जणांवर गुन्हा दाखल 

पोलिसांनी येथे कारवाई करत सदरची रक्कम जप्त केली आहे. पाकिटांवर कार्यकर्त्यांची नावे लिहिलेली दिसून आली. शिवाय एक मोठी यादीही पोलिसांच्या हाती लागली. मात्र मोठी रोख रक्कम हाती लागू शकली नाही. याप्रकरणी पोलिसांनी पेट्रोल पंप मालक अब्बास अजानी आणि सुयोग भोयर या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हे पैसे कोणत्या उमेदवाराचे होते. ते कुठून आले, किती होते, किती जणांना वाटप झाले, याचा तपास पोलीस करीत आहेत. मात्र हे पैसे नेमके कुणाचे, याची माहिती भद्रावतीचे मतदार खासगीत सांगत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांना पिक विमा 15 डिसेंबर पर्यंत काढता येणार

Horoscope: सहा राशींवर शनि महाराज कृपा; संकटं होतील दूर; आर्थिक लाभाचे योग, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

SCROLL FOR NEXT