Sudhir Mungantiwar Devendra Fadanvis Saamtv
महाराष्ट्र

Chandrapur News: दांपत्याकडून देवेंद्र फडणवीस - मुनगंटीवारांना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल; काय आहे प्रकरण?

Death Threat To Devendra Fadanvis: विदर्भातील बाबा मस्की आणि शोभा मस्की या दांपत्याने शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

संजय तुमराम

Chandrapur News:

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विदर्भातील बाबा मस्की आणि शोभा मस्की या दांपत्याने शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असून हा व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Munguntiwar) यांच्या विरोधात सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमकीचा व्हिडिओ टाकण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात राहणाऱ्या व विविध आंदोलनात सतत सहभागी होणाऱ्या बाबा मस्की व शोभा मस्की या दाम्पत्याने सोशल मीडियावर शिवीगाळ करत जीवे मारण्याचा व्हिडीओ पोस्ट केला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या राजुरा येथील कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या दांपत्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांनी या दांपत्यावर सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. गडचांदूर पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई करत आहेत.

दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. वेगळा विदर्भ -शेतजमिनीचे पट्टे , वन्यजीवाद्वारे पिकांचे होणारे नुकसान यासंदर्भात भाष्य करताना फडणवीस व मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच या संदर्भातील आंदोलनाकडे दोन्ही नेत्यांनी पाठ फिरवल्याने ही धमकी दिल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akot News : मुसळधार पावसाने पूरजन्य स्थिती; अमीनापूर गावचा संपर्क तुटला, शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT