Viral Video: उंच दोरीवरुन चालताना तरुणाचा तोल गेला अन् थेट खाली.. भयंकर घटनेचा थरारक VIDEO

Viral Video: दोरीवरुन चालणाऱ्या सर्कसमधील कलाकाराचा तोल गेल्याने हा अपघात झाला... ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video:
Viral Video:Saamtv

Viral Video News:

सर्कसमधील कलाकारांचे आयुष्य म्हणजे जीवन- मरणाची लढाई. अनेक थरारक, जीवघेणे स्टंट करत हे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. मात्र अनेकदा हे स्टंट फसतात ज्यामुळे मोठे अपघातही होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका सर्कसमधील तरुणाचा अपघात झाल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला एकापेक्षा एक भयानक घटनांचे व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी भीषण अपघात, जीवघेणे स्टंट, तर कधी मारहाणीच्या घटना पाहून नेटकऱ्यांचीही भितीने गाळण उडते. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. दोरीवरुन चालणाऱ्या सर्कसमधील कलाकाराचा तोल गेल्याने हा अपघात झाला.

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एका मोकळ्या जागेत ही सर्कस भरवल्याचे दिसत आहे. हा खेळ पाहण्यासाठी लोकांनीही गर्दी केली असून मोठे बांबु उभारल्याचे दिसत आहे. यावेळी जमलेल्या लोकांना आपली कला दाखवण्यासाठी उंच दोरीवर चढतो. मात्र अचानक उभारलेले बांबू निसटतात आणि हा तरुण एवढ्या उंचीवरुन खाली कोसळतो.

Viral Video:
Manoj Jarange Patil: "मराठ्यांनी ठरवलं तर तुला आयुष्यभर...", मनोज जरांगेंचा रावसाहेब दानवेंना इशारा

अचानक घडलेल्या या दुर्घटनेने सर्वांचाच थरकाप उडतो. त्या तरुणाच्या मदतीसाठी काही जण धावल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आला असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी ही दुर्घटना भयंकर असल्याचे म्हणले आहे, तर काही जणांनी असे स्टंट करताना सुरक्षेची काळजी घेण्याचाही सल्ला दिला आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Video:
Mumbai News: मुंबईत १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; चेंबूरमधील संतापजनक घटना, आरोपी अटकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com