Chandrapur Tiger Attack One Killed Saam Tv News
महाराष्ट्र

Chandrapur News : मुंडकं धडापासून वेगळं, हात-पाय तोडलेले, संपूर्ण शरीर खाल्लेलं; चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

Chandrapur Tiger Attack One Killed : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात भादूर्णी येथे वाघाच्या हल्ल्यात एका जणाचा मृत्यू झाला आहे. बकऱ्यांना चारण्यासाठी तो जंगलात गेला होता. मात्र, रात्र झाली तरी तो घरी परतला नाही.

Prashant Patil

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात भादूर्णी येथे वाघाच्या हल्ल्यात एका जणाचा मृत्यू झाला आहे. बकऱ्यांना चारण्यासाठी तो जंगलात गेला होता. मात्र, रात्र झाली तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे आज रविवारी सकाळी त्याचा शोध घेण्यात आला असता मृतदेह आढळून आला. त्याचं संपूर्ण शरीर वाघानं खाल्लं होतं. केवळ हात तेवढे शिल्लक राहिले होते. यामुळे वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे.

नवऱ्यासमोरच बायकोचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

दरम्यान, चार दिवसांपूर्वी देखील एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. चिमूर तालुक्यातील करबडा येथे तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. कचराबाई अरुण भरडे (वय ५४) असं वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव असून तेंदूपत्ता गोळा करताना पतीसमोरच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. पंचनामा करून चिमूर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह रवाना करण्यात आला. घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव असून चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता तोडणाऱ्या ६ महिलांचा गेल्या ५ दिवसात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी देखील अशीच घटना समोर आली होती. तेव्हा वाघाच्या हल्ल्यात ३ महिला ठार झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरापासून जवळच असलेल्या वनविभागाच्या परिक्षेत्रात घडली होती. या घटनेत एकाच कुटुंबातील सासू, सूनेचा मृत्यू झाला होता.

मृत महिलांची नावे कांता बुधाजी चौधरी (वय ६५), शुभांगी मनोज चौधरी (वय २८), रेखा शालिक शेंडे (वय ५०) अशी आहेत. या तिन्ही महिला मेंढा माल गावातील आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभाग अधिकारी आणि पोलीस कर्मचारी दाखल झाले. तिन्ही महिलांच्या मृत्यूने चौधरी आणि शेंडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT