पुणे-नागपूर स्पेशल रेल्वे धावणार, वेळ काय, कुठे कुठे थांबणार? Saam Tv
महाराष्ट्र

Pune Nagpur Train : पुणे-नागपूर स्पेशल रेल्वे धावणार, वेळ काय, कुठे कुठे थांबणार?

Central Railway: मध्य रेल्वेने पुणे-नागपूर-पुणे मार्गावर विशेष वातानुकुलीत साप्ताहिक गाडी १२ एप्रिल ते २४ मे दरम्यान चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे-नागपूर-पुणे या मार्गावर विशेष वातानुकुलीत (AC) साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी उन्हाळ्याच्या काळात मर्यादित कालावधीसाठी चालवण्यात येणार आहे. ज्याने प्रवाशांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही.

गाडी क्रमांक ०१४३९ पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष गाडी १२ एप्रिल ते २४ मे दरम्यान चालविण्यात येणार आहे. ही गाडी प्रत्येक शनिवारी पुणे येथून रात्री ७.५५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दुपारी २.४५ वाजता पोहचेल. या गाडीच्या सात फेर्‍या होणार आहे.

नागपूर-पुणे विशेष गाडी एप्रिल ते २५ मेपर्यंत धावणार आहे. ही गाडी प्रत्येक रविवारी दुपारी ४.१५ वाजता नागपूर येथून प्रस्थान करणार असून दुसर्‍या दिवशी सकाळी ७.२० वाजता पुणे येथे दाखल होईल. गाडीला आठ द्वितीय १० तृतीय श्रेणी वातानुकूलित (AC) आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅन असे एकूण २० कोच राहणार आहे.

पुणे-नागपूर-पुणे विशेष गाडीला कॉर्ड लाइन,अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा स्थानकावर थांबा राहणार आहे. दोन्ही गाड्यांचे आरक्षण संगणकीकृत आरक्षण केंद्र व आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर करता येईल, अशी माहिती रेल्वेच्या मध्य विभागने दिली आहे.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT