Central Railway : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबईहून 'या' जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी रेल्वेच्या कालावधीत वाढ, कारण...

Railway News : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी वाढत असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि हरंगुल या दरम्यान विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ केली जाणार असल्याचे म्हटले आहे.
railway news
railway newssaam tv
Published On

Railway News Update : उन्हाळा सुरु झाला आहे. लवकरच एप्रिल महिना सुरु होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टा देखील सुरु झाल्या आहेत. त्यामुळे सुट्टीनिमित्ताने फिरण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडतात. सध्या मध्य रेल्वे प्रवाशांची गर्दी होत आहे. ही अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार पुणे-सोलापूर-कोल्हापूर-हरंगुल या दरम्यान विशेष गाड्या धावणार आहेत.

खाली दिलेल्या तपशीलांनुसार विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ करणार आहे:

१. ट्रेन क्रमांक 01435 सोलापूर - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष, जी दिनांक २५.०३.२०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता दिनांक २९.०४.२०२५ पर्यंत येणार आहे.

२. ट्रेन क्रमांक 01436 लोकमान्य टिळक टर्मिनस - सोलापूर साप्ताहिक विशेष, जी दिनांक २६.०३.२०२५ पर्यंत चालण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत चालवण्यात येणार आहे.

३. ट्रेन क्रमांक 01438 तिरुपती - सोलापूर साप्ताहिक विशेष, जी दिनांक २८.०३.२०२५ पर्यंत चालण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता दिनांक २५.०४.२०२५ पर्यंत चालवण्यात येणार आहे.

४. ट्रेन क्रमांक 01437 सोलापूर - तिरुपती साप्ताहिक विशेष, जी दिनांक २७.०३.२०२५ पर्यंत चालण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता दिनांक २४.०४.२०२५ पर्यत चालवण्यात येणार आहे.

५. ट्रेन क्रमांक 01091/01092 खंडवा - सनवाड - खंडवा अनारक्षित विशेष, जी दिनांक ३०.०३.२०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता दिनांक २९.०४.२०२५ पर्यंत चालवण्यात येणार आहे.

railway news
Central Railway : बदलापूर-कर्जतदरम्यान लोकल बंदच, मध्य रेल्वेचा रविवारी ३ तास स्पेशल ब्लॉक

दिनांक ३१.०३.२०२५ पर्यंत धावण्यासाठी अधिसूचित केलेल्या खालील दैनिक गाड्यांच्या सेवा दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत.

- ट्रेन क्रमांक 01461 सोलापूर - दौंड अनारक्षित दैनंदिन विशेष

- ट्रेन क्रमांक 01462 दौंड - सोलापूर अनारक्षित दैनिक विशेष

- ट्रेन क्रमांक 01463 सोलापूर - कलबुरगि अनारक्षित दैनंदिन विशेष

- ट्रेन क्रमांक 01464 कलबुरगि - सोलापूर अनारक्षित दैनंदिन विशेष

- ट्रेन क्रमांक 01212 नाशिक रोड - बडनेरा अनारक्षित दैनंदिन विशेष

- ट्रेन क्रमांक 01024 कोल्हापूर - पुणे दैनंदिन विशेष

- ट्रेन क्रमांक 01023 पुणे - कोल्हापूर दैनंदिन विशेष

- ट्रेन क्रमांक 01487 पुणे - हरंगुल दैनंदिन विशेष

- ट्रेन क्रमांक 01488 हरंगुल - पुणे दैनंदिन विशेष

वरील गाड्यांच्या वेळेत, संरचनेत आणि थांब्यात कोणताही बदल होणार नाही.

railway news
Bajinder Singh : महिलेवर बलात्कार प्रकरणात 'येसू येसू फेम पाद्री बजिंदर सिंग' दोषी; कोर्टाचा निर्णय, 'या' दिवशी शिक्षा सुनावणार

दिनांक ३१.०३.२०२५ पर्यंत चालवण्यासाठी अधिसूचित केलेली ट्रेन क्रमांक 01211 बडनेरा - नाशिक रोड अनारक्षित दैनंदिन विशेष आता दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत चालेल आणि दिनांक ०१.०४.२०२५ पासून सुधारित वेळेनुसार चालले, जसे की:

- गाडी क्रमांक 01211 बडनेरा येथून सकाळी १०.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी १९.०५ वाजता नाशिक रोड येथे पोहोचेल.

- ट्रेन क्रमांक 01211 च्या संरचनेत आणि थांब्यात कोणताही बदल होणार नाही.

आरक्षण: विशेष गाडी क्रमांक 01435, 01436, 01437, 01024, 01023, 01487 आणि 01488 च्या विस्तारित फेऱ्यांसाठी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कासह बुकिंग सुरू आहे.

railway news
Pune Crime News : घरात घुसला, फोन हिसकावला अन्...; पुण्यात गॅस सिलिंडर डिलिव्हरी बॉयकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com