Raosaheb Danve Saam Digital
महाराष्ट्र

Raosaheb Danve : मी, तुमची सासू! काही गोष्टी विचारून करत जा; केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे असं का म्हणाले?

Central Minister Raosaheb Danve : जालन्यात घाणेवाडी व जायकवाडी पाणी पुरवठा योजनेतून 72 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

Sandeep Gawade

Raosaheb Danve

जालन्यात घाणेवाडी व जायकवाडी पाणी पुरवठा योजनेतून 72 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी मी, तुमची राजकारणातील सासू आहे, काही गोष्टी मला विचारून करत जा, असा चिमटा जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांना काढला. जिल्ह्यात रावसाहेब दानवे यांच्या शिवाय काहीच शक्य नसल्याच सांगतं. सर्वपक्षीय नेत्यांना एका प्रकारे इशाराच दिलाय. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला होता.

शहर सुधरले आता माणसाने सुद्धा विचार करायला पाहिजे की आपलं शहर आता कसं सुधारेल, असं मत रावसाहेब दानवे यांनी जालन्यात केले आहे. पुढच्या 10 वर्षात जालना छत्रपती संभाजीनगर एक होईल असा विश्वास दानवे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जालना संभाजीनगर ला जोडायला मेट्रोची गरज पडेल. ते काम पण आपण करू असं दानवे म्हणालेत. विकासाठी आम्ही सर्व पक्षीय नेते एक असून विकासासाठी हा राम रथ आम्ही एकत्रित पने लढवू, असे प्रतिपादन दानवे यांनी जालन्यात बोलतांना केलंय. दानवे यांना जालना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा आज भाजपा पदाधिकाऱ्यांनी क्रेन च्या साहाय्याने 200 किलोंचा हार घालून त्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : ठाकरेंची युती होताच एकनाथ शिंदेंनी गिअर बदलला! मंत्री, आमदारांसह १२ नेत्यांना निवडणूक आखाड्यात उतरवलं

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे कोथरूडचे ब्लॉक अध्यक्ष विजय खळदकर अजित पवार यांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपमध्ये अंतर्गत राडा का झाला? आयारामांचा प्रवेश की आणखी काही...

Body Lotion: बॉडी लोशन खरेदी करताना 'या' गोष्टींची नक्की काळजी घ्या

Shiv Sena-MNS Seat Sharing: पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना-मनसे किती जागा लढवणार? फॉर्म्युल्याची आतली बातमी फुटली

SCROLL FOR NEXT