Amit Shah  Saam tv
महाराष्ट्र

Amit Shah Latest Speech : इंडिया आघाडीतील सर्व पक्ष घराणेशाही मानणारे; छत्रपती संभाजीनगरमधून अमित शहांचा हल्लाबोल

Amit Shah Latest Speech : महाराष्ट्रातील दौऱ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या छत्रपती संभाजीनगरमधील जाहीर सभेला हजेरी लावली. या जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

Vishal Gangurde

Amit Shah Latest Speech :

भाजपने आगामी लोकसभा निडवणुकीसाठी कंबर कसली आहे. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शहा हे दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान अमित शहांनी भाजपच्या छत्रपती संभाजीनगरमधील जाहीर सभेला हजेरी लावली. या जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. 'इंडिया आघाडीतील सर्व पक्ष घराणेशाही मानणारे आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. (Latest Marathi News)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणातील सर्व मुद्दे

१. सोनिया गांधी यांचा उद्देश मुलाला पंतप्रधान करण्याचे आहे. उद्धव ठाकरे यांना मुलाला मोठं करायचं आहे. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांना भाच्याला मोठं करायचे आहे.

२. आज सभेतून संकल्प करून जाऊ की सरदार वल्लभभाई पटेल यांनी येथून निजामशाही हटवली आहे. आता या नव्या निजामाला येथून हाकलायचे आहे.

३. काँग्रेस सरकारने गेल्या १० वर्षात काय दिले? आम्ही त्यांच्यापेक्षा चार पटीने प्रकल्प दिले.

४. तुमच्याकडे दहा वर्षे होते आणि आमच्याकडे दहा वर्षे होते. मग हिशोब करा.

५. भारतीय जनता पक्षाला मत म्हणजे महान भारताला मत. भाजपला मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत

६. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या विनंती करतो की, भारताला विश्वगुरु करणाऱ्यांना द्या. तुमचं मत लोकशाहीला मजबूत करणाऱ्यांना द्या.

७. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष हे घराणेशाही मानणारे आहेत. इंडिया आघाडीतील पक्षातील वरिष्ठ नेते कुटुंबातील सदस्यांना मोठं करायचं आहे.

८. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विकसित भारत करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. पाकिस्तानातून बॉम्ब स्फोट व्हायचे. मोदी सरकारच्या कार्यकाळात घरात घुसून उत्तर दिलं.

९. काश्मीरला जोडण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मोदींनी कलम ३७० रद्द केलं.

१०. पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील आणि अर्थ व्यवस्था ५ नंबरहून 3 नंबरवर येईल, म्हणून त्यांना पंतप्रधान करायचे आहे.

१२. जगातील १४ देशांनी मोदींना भारतरत्न सारख्या पुरस्कारांने सन्मानित केले आहे. तो त्यांचा गौरव नाही, तुमचा आमचा गौरव आहे. पंतप्रधान मोदी देशात परदेशात जातात आणि आपल्या भाषेत बोलून आपल्या भाषेचा सन्मान करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

SCROLL FOR NEXT