MAHARASHTRA SCHOOL BUS SAFETY RULES 2026 | NEW GUIDELINES MANDATORY IN 3 MONTHS saam tv
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; School बसमध्ये CCTV, लोकेशन सक्तीचे

Maharashtra School Bus Safety Rules 2026 Implementation Details: महाराष्ट्रात शालेय बस सुरक्षेसाठी नवीन नियम लागू; तीन महिन्यांत अंमलबजावणी बंधनकारक. सीसीटीव्ही, ट्रॅकिंग सिस्टम, सीटबेल्ट आणि फायर अलार्मसह अत्याधुनिक सुविधा सक्तीच्या.

Omkar Sonawane

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र शासन राजपत्रात 16 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करणीय आलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बस नियमन) (प्रथम सुधारणा) नियम 2026 लागू करण्यात आले असून, पुढील तीन महिन्यांत या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनांची वयोमर्यादा वाढवली: मुंबई महानगर क्षेत्र वगळता राज्यातील इतर सर्व भागांमध्ये शालेय बस आणि शालेय व्हॅनच्या परवान्यासाठी वाहनाची वयोमार्यादा नोंदणी दिनांकापासून 15 वर्षावरून 20 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. शालेय बसच्या शुल्काचे दर निर्धारण करण्याचे पूर्ण अधिकार आता संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला प्रदान करण्यात आले आहेत.

सुरक्षेसाठी या हायटेक बंधनकारक

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व शालेय बस आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये खालील अत्याधुनिक सुविधा बसवणे सक्तीचे केले आहे.

सुरक्षा आणि ट्रॅकिंग: व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंगसोबत पॅनिक बटण

अग्निसुरक्षा: फायर डिटेक्शन अँड अलार्म सिस्टिम

सीसीटीव्ही आणि डेटा: सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टिम किमान ३० दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्ड जतन करणे आवश्यक.

पालकांसाठी अ‍ॅप: वाहनाचे थेट लोकेशन दर्शवणारे मोबाईल अ‍ॅप, विद्यार्थ्यांची डिजिटल हजेरी नोंद आणि पालकांना अलर्ट देणारी संदेश प्रणाली.

सीटबेल्टची सक्ती: वाहनातील प्रत्येक खुर्चीला सीटबेल्ट असणे असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

शाळा प्रशासन, बस कंत्राटदार आणि वाहनचालकांनी नवीन नियमांनुसार सर्व तांत्रिक बदल तीन महिन्यांच्या आत पूर्ण करून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Shastra : तुमच्या किचनचा ओटा कोणत्या रंगाचा? वास्तू शास्त्रानुसार 'हे' रंग आहेत शुभ

Rain Update : विजांसह मुसळधार पाऊस, कोकणासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: कर्ज आणि मुलीच्या उपचाराच्या चिंतेने शेतकऱ्याने संपवलं जीवन

BJP MLA Accident: भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात, गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेलं; अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO

Sunday Horoscope: नशीब चमकणार! या 3 राशींना मिळणार मोठी संधी; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT