sangli, crime news, police saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime News : ज्वेलर्सवर चाकू हल्ला, कारची माेडताेड; सांगली जिल्ह्यात सात जणांवर गुन्हा दाखल

याच बरोबर फिर्यादी सुरेश गायकवाड यास संशयिताने जीवे मारण्याची धमकी दिली.

विजय पाटील

Sangli News : ज्वेलर्सची उधारी मागितली म्हणून दोघांना सात जणांनी चाकू, खंजीरने भोकसून गंभीररीत्या जखमी केल्याची घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावात घडली. याबाबात आटपाडी पोलिस ठाण्यात सुरेश जयवंत गायकवाड यांनी तक्रार नाेंदवली आहे. या तक्रारनुसार सात जणांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

सुरेश गायकवाड यांचे आटपाडीत शुभम ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानातून कोळे येथील एकाने पाच वर्षांपूर्वी सोने खरेदी केले होते. खरेदी केलेल्या सोन्याची काही रक्कम पाच वर्षे होऊन देखील देण्यात न आल्याने गायकवाड हे गेल्या काही महिन्यांपासून त्या ग्राहकाकडे पैशांची मागणी करत होते.

सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास शेटफळे येथे राहत असणारे सुरेश गायकवाड यांच्या घरासमोर आरोपी रमेश आलदर, रावसो आलदर, बिरा खरात, नेताजी सरगर व अन्य अनोळखी तीन जणांनी ज्वेलर्सची राहिलेली उधारी देतो असा बहाना करून एकत्र आले होते. यावेळी सुरेश गायकवाड यांना पैसे देण्याच्या बहाण्याने घराबाहेर बोलावून चाकूने हातावर व पोटावर वार केले. यावेळी त्याचा गाडीवरील चालकाला ही मारहाण (crime) करण्यात आली.

तेथे असणारा हेमंत गायकवाड हा भांडणे सोडवण्यासाठी गेला असता त्याच्यावर ही धारदार शस्त्राने वार केले. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले आहे. याच बरोबर फिर्यादी सुरेश गायकवाड यास जीवे मारण्याची धमकी दिली.

फिर्यादी यांचे मित्र बाळासाहेब जगदाळे यांच्या चार चाकीची काच फोडून हल्लेखाेरांनी मोडतोड केली आहे. दरम्यान जखमींवर आटपाडी येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT