Cancer Screening: वयाच्या ३० व्या वर्षानंतर प्रत्येक स्त्री-पुरुषाने 'ही' महत्त्वाची टेस्ट केलीच पाहिजे; अन्यथा...

Cancer Screening After 30: कॅन्सरची सुरुवात अनेकदा कोणत्याही लक्षणांशिवाय होऊ शकते. त्यामुळे वयाच्या ३० वर्षांनंतर कोणत्या तपासण्या महत्त्वाच्या आहेत? तोंड, स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची स्क्रीनिंग कधी करावी? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला आणि महत्त्वाची लक्षणं.
Cancer Screening
Cancer Screeningsaam tv
Published On: 

कॅन्सरचं नाव ऐकलं तरी अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. शरीरात नेमके कोणते बदल झाले की कॅन्सर होतो, असा प्रश्नही अनेकांना पडतो. पण कॅन्सरबाबत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी कॅन्सरची सुरुवात झाल्यानंतर शरीरात काही लक्षणं दिसतातच असं नाही. अनेकदा व्यक्तीला कोणताही त्रास जाणवत नाही. रोजची कामंही नेहमीप्रमाणे सुरू असतात. शरीरात कॅन्सरची सुरुवात झालेली असू शकते. आजार वाढल्यानंतर किंवा शरीरात पसरल्यानंतर त्याची माहिती मिळते.

अशा वेळी एक प्रश्न महत्त्वाचा ठरतो. कोणताही त्रास नसताना कॅन्सरची तपासणी करून घेणं गरजेचं आहे का? डॉक्टरांच्या मते, वयाच्या ३० वर्षांनंतर कॅन्सरच्या काही तपासण्यांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. वेळेत आजार समजला तर त्यावर उपचार करणं आणि तो नियंत्रणात ठेवणं सोपं होऊ शकतं.

Cancer Screening
Blood vessel health: प्लाक जमा होऊन रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यात? या 5 ड्रिंक्सने लगेच वितळेल चरबी

कॅन्सर स्क्रीनिंग म्हणजे नेमकं काय?

कॅन्सर स्क्रीनिंग म्हणजे शरीरात आजाराची ठराविक लक्षणं नसतानाही केली जाणारी तपासणी. या तपासणीचा उद्देश कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यातच शोधणं किंवा भविष्यात कॅन्सर होण्याची शक्यता असलेले बदल ओळखणं हा असतो.

ग्रेटर नोएडामधील कैलाश हॉस्पिटलचे कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. साहिल बंब्रू यांच्या म्हणण्यानुसार, कॅन्सरच्या सुरुवातीच्या काळात अनेकदा कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे आजाराचं निदान होण्यास उशीर होऊ शकतो. स्क्रीनिंगच्या मदतीने वरकरणी निरोगी दिसणाऱ्या व्यक्तीमध्येही कॅन्सर किंवा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात झालेले बदल शोधता येतात.

वयाच्या ३० वर्षांनंतर कोणत्या कॅन्सरची तपासणी करावी?

भारतातील राष्ट्रीय कॅन्सर नियंत्रण कार्यक्रमात ३० वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या तपासणीवर विशेष भर दिला जातो. यामध्ये प्रामुख्याने तोंडाच्या कॅन्सरची तपासणी केली जाते. महिलांसाठी स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर (सर्व्हायकल कॅन्सर) यांची तपासणी महत्त्वाची आहे.

Cancer Screening
High Cholesterol: शरीरात साचलेलं कोलेस्ट्रॉल झटक्यात निघेल बाहेर; फक्त दररोज सकाळी चावून खा हे 1 पाच रूपयांचं हिरवं पान

पण वयाची ३० वर्षे पूर्ण झाली म्हणून प्रत्येकाने सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या तपासण्या करून घ्याव्यात, असं नाही. कोणत्या व्यक्तीला कोणती तपासणी गरजेची आहे हे डॉक्टर ठरवतात. त्यामुळे आपल्या प्रकृतीनुसार आणि जोखमीनुसार डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

तंबाखू आणि गुटखा खाणाऱ्यांनी विशेष काळजी घ्या!

जे लोक बिडी, सिगारेट, तंबाखू किंवा गुटखा खातात, त्यांना तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशा लोकांनी अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे. त्यांनी डॉक्टरांना भेटून स्वतःची तपासणी आणि कॅन्सरचा धोका याबाबत माहिती घ्यावी.

त्याचप्रमाणे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला यापूर्वी कॅन्सर झाला असेल तर त्याकडेही दुर्लक्ष करू नये. काही लोकांमध्ये कुटुंबातील आधीच्या आजारांमुळे कॅन्सर होण्याचा धोका इतरांपेक्षा जास्त असू शकतो. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

शरीरात ही लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नका!

शरीरात काही बदल दिसत असतील तर केवळ स्क्रीनिंगची वेळ येण्याची वाट पाहू नका. अशा वेळी थेट डॉक्टरांची भेट घेणं गरजेचं आहे.

  • शरीरात कुठेही नवीन गाठ जाणवणं.

  • तोंडात झालेली जखम किंवा घाव बराच काळ बरा न होणं.

  • कोणतंही कारण नसताना वजन कमी होणं.

Cancer Screening
High Cholesterol: शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलंय? हे 5 पदार्थ खेचून बाहेर काढतील रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.