Vijay Wadettiwar On Sanjay Rathore 
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढणार? काँग्रेसच्या त्या मागणीनं सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढली!

Vijay Wadettiwar On Sanjay Rathore: संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जमीन घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करत त्यांना मंत्रिपदावरून दूर करावं अशी मागणी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते यांनी यांनी केलीय.

Bharat Jadhav

सुनील काळे, साम प्रतिनिधी

शिंदे गट शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई बेलापूर येथील जमीन लाटण्याच्या प्रकरणात मंत्री राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच त्यांना मंत्रिपदावरून दूर करावं, अशी मागणी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय.

नवी मुंबई बेलापूर येथील गोरबंजारा समाजाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी आरक्षित असलेला भूखंड‌ संजय राठोड यांनी लाटल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. संजय राठोड यांनी हा भूखंड शाळेला दिल्याचा आरोप वडेवट्टीवार यांनी केला. दरम्यान या गैरव्यवहाराची दखल लोकायुक्तांनी घेतली आहे.५०० कोटींचा भूखंड लाडक्या मंत्र्यांना म्हणजेच संजय राठोड यांना बहाल करण्यात आल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते यांनी केलाय. भूखंड गैरव्यवहार समोर आल्यानंतर मंत्री संजय राठोड यांनी जमीन परत करतो, असं म्हटलं. त्यावरुनही वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर टीका केलीय. पण आधी चोरी कशाला करायची, मग म्हणायचं आम्ही परत करतो. मंत्री राठोड यांना मंत्रीपदावरुन दूर करावं. तसेच त्यांच्यावर ४२० चा गुन्हा दाखल व्हावा अशी काँग्रेस नेते आणि मागणी केलीय. संजय राठोड यांनी बंजारा समाजाची फसवणूक केल्याचा आरोपीही वडेट्टीवार यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन जाहीर सभा

घोटाळा झाला! लालूप्रसाद यादवांचं अख्खं कुटुंब अडचणीत; राबडी, तेजस्वी, तेजप्रताप, मीसा भारतींसह ४६ जणांवर आरोपनिश्चिती

Drinking water: तुम्हीही उभं राहून पाणी पिता? आजच बदल ही सवय; ४ आरोग्य समस्या उद्भवू शकतात

Nagpur Politics: नागपूरमध्ये भाजपकडून मोठी कारवाई, ३२ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, बॅगचे स्कॅन अन् स्टिकर लावूनच करता येणार प्रवास; नाहीतर...

SCROLL FOR NEXT