Shiv Sena Crisis : 'धनुष्यबाण'वरून पुन्हा संघर्ष, दादरमध्ये शिवसेनेचे दोन्ही गट भिडले; विधानसभेपूर्वी शिवसेनेतील संघर्ष तीव्र होणार?

Maharashtra Politics 2024 : विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या शाखांवरील धनुष्यबाण काढून मशाल लावण्याचे आदेश दिले. त्याची ठिणगी मुंबईत पडलीय. धनुष्यबाणावरुन ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा आमने-सामने आलेत.
Political News
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Latest UpdateSAAM TV
Published On

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या शाखांवरील धनुष्यबाण काढून मशाल लावण्याचे आदेश दिले. त्याची ठिणगी मुंबईत पडलीय. धनुष्यबाणावरुन ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा आमने-सामने आलेत. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या शाखांवरुन वातावरण तापायला सुरुवात झालीय. उद्धव ठाकरेंनी ठाकरे गटाच्या शाखांवरुन धनुष्यबाण हटवून त्या ठिकाणी मशाल चिन्ह लावण्याचे आदेश दिले आणि वादाची पहिली ठिणगी प्रभादेवीत पडली. ठाकरेंच्या आदेशानंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी आपापल्या भागातील धनुष्यबाण काढायला लागले. त्यावरुनच प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिराच्या बाजूला असलेल्या लोखंडी बोर्डावरील धनुष्यबाण ठाकरे गटाचे पदाधिकारी काढत असताना शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आलेत....तर सदा सरवणकरांच्या निधीतून फलक लावल्याचा दावा शिंदे गटाने केलाय.

दुसरीकडे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय. तर या प्रकरणावरुन दोन्ही गटाने एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केलीय.शिवसेना कुणाची यासंदर्भातील निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तर दुसरीकडे आगामी विधानसभेच्या दृष्टीने मतदारांमध्ये संभ्रम राहू नये म्हणून शिवसेनेच्या शाखांवरील धनुष्यबाण काढण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले होते.

Political News
Uddhav Thackeray : ठाकरेंना व्हायचंय पुन्हा मुख्यमंत्री ? उद्धव ठाकरेंची दिल्लीतून गुगली, मविआतील मित्रपक्षांची गोची?

शाखा हीच शिवसेनेची ताकद. त्यामुळे शिवसेनेतील फुटीनंतर डोंबिवली आणि मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखांचा वाद समोर आला होता. त्यावरुन ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले होते. त्यातच आता ठाकरेंच्या आदेशामुळे हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या या वादाचा ठाकरेंना फायदा होणार की वाद शिंदेंच्या पथ्यावर पडणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Political News
Vidhan Sabha Election : शिवस्वराज्य यात्रेला ९ ऑगस्टपासून सुरुवात; 'राष्ट्रवादी' लढत असलेल्या त्या ३१ मतदारसंघातून पहिल्या टप्प्यात निघणार यात्रा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com