Latur Accident News Saam TV
महाराष्ट्र

Latur Breaking News: लातूर-नांदेड महामार्गावर कारचा भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू

Latur Accident News: देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कारने ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले.

Satish Daud

संदीप भोसले, साम टीव्ही लातूर

Latur-Nanded Highway Car Accident

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कारने ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना लातूर-नांदेड महामार्गावरील महाळंग्रा शिवारात रविवारी (३ मार्च) पहाटेच्या सुमारास घडली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोहन बालाजी कोतवाल (वय २७) शिवराज हरिश्चंद्र लंकाढाई (वय २६) कृष्णा विठ्ठल मंडले (वय २४) आणि नर्मन राजाराम कात्रे (वय ३३) अशी अपघातातील (Latur Accident News) मृतांची नावे आहेत. मृत तरुण नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मंडके, शुभम किशोर लंकाढाई हे चौघे तरुण स्विफ्ट डिझायर कारने तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले होते. (Latest Marathi News)

दरम्यान, चाकूर तालुक्यातील महाळंग्रा शिवारात कार आली असता, कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातरच कार समोरून जात असलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडकली. अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरक्षा चक्काचूर झाला.

या भीषण अपघातात चारही तरुणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, स्थानिकांकडून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT