cancel nagpur goa shaktipeeth expressway 12 districts demands cm eknath shinde Saam Digital
महाराष्ट्र

नागपूर गाेवा शक्तीपीठ महामार्ग रद्द न झाल्यास मंत्र्यांना नेत्यांना गावबंदी, संघर्ष समितीचा निर्णय; धैर्यशील मानेंचाही सरकारला घरचा आहेर

cancel nagpur goa shaktipeeth expressway demands 12 districts : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही, मुख्यमंत्र्यांनी निर्णय सुधारावा अशी मागणी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी केली आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगांवकर / विजय पाटील

नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी पर्यायी मार्ग असताना शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास का? सरकारनं रस्ता रद्द करावा अन्यथा आम्ही मंत्र्यांसह सरकारमधील नेत्यांना गाव बंदी, जिल्हा बंदी करू असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी सरकारला दिला आहे.

गिरीश फोंडे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्गाची फेर आखणी करु असे म्हटले आहे. त्याचा देखील आमचा ठाम विराेध आहे. हा रस्ता रद्दच करा अशी आमची भूमिका आहे. शक्तीपीठ महामार्ग घालवायचा असेल तर सरकार घालवलं पाहिजे याच भूमिकेत आम्ही आहाेत असेही फाेंडेंनी नमूद केले.

फाेंडे पुढे बाेलताना म्हणाले मुख्यमंत्री म्हणतात हे जनतेचे सरकार आहे मात्र ते जनतेचे नसून कंत्राटदारांचे सरकार असून जनतेच्या पैशाचा चुराडा करणारा हा महामार्ग आहे. नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी पर्यायी मार्ग असताना या महामार्गाचा अट्टाहास का? असा सवाल करत सरकारनं हा रस्ता रद्द करावा अन्यथा आम्ही त्यांना गाव बंदी आणि जिल्हा बंदी करू असा इशारा देखील फाेंडेंनी दिला.

शक्तिपीठ महामार्गवरुन धैर्यशील मानेंचा सरकारला घरचा आहेर

शक्तिपीठ महामार्ग होणार आहे. पण हा शक्तीपीठ महामार्ग शक्ती वाढवणारा आहे का शक्ती काढून घेण्याचा हा महामार्ग आहे का. हे काही कळेना झाले आहे. पण देवांच्या नावाखाली आमच्या घरा वर कोण्ही नांगर फिरवत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही अशी टीका कोल्हापूर हातकणंगले मतदार संघातील खासदार धैर्यशील माने यांनी करत सरकारला घरचा आहेर दिला आहे.

आज (शनिवार) शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून धैर्यशील माने उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे विश्वजीत कदम अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि काँग्रेसचे नेते या ठिकाणी आंदोलन करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silk Saree For Womens: महिलांसाठी सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, हे 5 पॅटर्न्स तुम्हाला नक्की आवडतील

Kolhapur Fort : गड-किल्ल्यांच्या शौर्य गाथेतील मानाचा तुरा, कोल्हापूरमध्ये आजही दिमाखात उभा आहे 'हा' किल्ला

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड; उदयनराजे भोसलेंनी दुसऱ्यांदा मारली बाजी

Maharashtra News Live Update: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उदयनराजे भोसलेंची संचालकपदी बिनविरोध निवड

Badlapur news : बदलापूर नगरपालिकेत आला अनोळखी पाहुणा; कर्मचाऱ्यांची उडाली दाणादाण , नेमक काय घडलं?

SCROLL FOR NEXT