Devotees bus accident Pandharpur
महाराष्ट्र

Accident : पंढरपूरजवळ भाविकांच्या बसला ट्रकची जोरदार धडक, भीषण अपघातात २ जणांचा मृत्यू

Pandharpur Accident : खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. पंढरपूरमधील भीषण अपघातामध्ये दोन भाविकांचा मृत्यू झालाय. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.

Namdeo Kumbhar

भरत नागणे, साम टीव्ही प्रतिनिधी

Pandharpur Accident News : सोलापूरमधील पंढरपूरजवळ भाविकांच्या खासगी भसचा भीषण अपघात झालाय. दुर्देवी घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झालाय. यामध्ये काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. भटुंबरे गावाजवळ आज पहाटे खासगी बस आण ट्रकचा भीषण अपघात (Devotees bus accident Pandharpur) झालाय. अपघात इतका भीषण होता की खासगी बसचा चुराडा झालाय. प्रवासाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.

पंढरपूरजवळ भाविकांच्या खासगी बसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण जखमी आहेत. पंढरपूर- टेंभुर्णी महामार्गावर आज पहाटे मालवाहतूक ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला. पंढरपूर जवळ असलेल्या भटुंबरे गावाजवळ पहाटे अपघात झाल्याचं समजतेय.

अपघातामधील जखमींना पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. स्थानिकांनीही तात्काळ धाव घेत मदत केली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकने खासगी बसला जोरदार धडक दिली. ट्रकच्या पुढील बाजूचा चुराडा झालाय. बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur Photos : जादू तेरी नजर; मृणालचं सौंदर्य पाहून काळजाचा ठोका चुकेल

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

Heart attack symptoms women: महिलांमध्ये दिसणारी हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा का वेगळी असतात? पाहा महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात

Pune News: पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, माथेफिरू तरुणाला अटक; उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Palghar : पालघरमधील एमआयडीसीत कंपनीला भीषण आग | VIDEO

SCROLL FOR NEXT