Kolhapur Saam
महाराष्ट्र

Kolhapur mall theft: स्टाईलमध्ये मॉलमध्ये फिरायचे अन्..., बंटी अन् बबलीचे कारनामे पाहून पोलिसही चक्रावले

Husband-wife thieves Kolhapur Crime News: कोल्हापूर शहरातील मॉलमध्ये फिरून महागड्या वस्तूंची चोरी करणाऱ्या बंटी आणि बबलीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

Bhagyashree Kamble

कोल्हापूर शहरातील मॉलमध्ये फिरून महागड्या वस्तूंची चोरी करणाऱ्या बंटी आणि बबलीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजवाडा पोलिसांनी कारवाई करून दोघांना ताब्यात घेतलं आहे. साने गुरूजी वसाहत परिसरात असणाऱ्या एका लोकल मॉलमध्ये २ दिवसांपूर्वी चोरी झाली होती. लोकल मार्टच्या मॅनेजरनं अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींनी ताब्यात घेतलं आहे.

परवेज शिलेदार आणि करिष्मा शिलेदार असं पती - पत्नीचे नाव आहे. हे जोडपं लोकल मार्टमध्ये जात महागडे वस्तू चोरायचे. मार्टमध्ये चोरी झाल्याचं समजताच मार्टच्या मॅनेजरनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच अज्ञाता विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

जुना राजवाडा पोलिसांनी मार्टमध्ये दाखल होत, सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीमध्ये मॉलमध्ये फिरून किमती वस्तूची चोरी करणारे दोघे आढळले. त्यात परवेज शिलेदार आणि करिष्मा शिलेदार हे कपल चोरी करत असल्याचं समोर आलं.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, शास्त्रीनगर परिसरात राहणाऱ्या परवेज शिलेदार आणि करिष्मा शिलेदार या पती पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या जोडप्याची चौकशी केली असता, त्यांनी २०२२ सालीही मॉलमधून चोरी केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर राहणार 20 तास खुले

Railway Mega Block : 'या' मार्गांवर रेल्वेचा मेगाब्लॉक, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Diwali 2025 : देशभरात धनतेरसचा उत्साह! सुवर्ण, चांदी आणि नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी |VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या कामाची बातमी! लाखांचं कर्ज झटक्यात, व्याज मात्र शून्य

Maharashtra Tourism : बॅग भरा अन् ट्रेकला चला, भावंडांसोबत भाऊबीजेला 'येथे' ट्रिप प्लान करा

SCROLL FOR NEXT