Mumbai MHADA: मुंबईत १२ लाखांत पूर्ण होणार घराचं स्वप्न; ४,७०० घरांसाठी लॉटरी, सोमवारपासून अर्ज करता येणार

BMC employees housing MHADA Lottery : मुंबई महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांठी पालिका प्रशासनाने म्हाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेतलाय. १२ लाखांत घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
Mhada Lottery
Mhada Lottery Saam Tv
Published On

MHADA Lottery News Update : मुंबईत स्वत:च्या मालकीचे घर असावे असे प्रत्येकाला वाटते. पण घराची किंमत आवाक्याबाहेर असल्यामुळे अनेकांचे स्वप्न अपूर्ण राहते. पण बीएमसी कर्मचाऱ्यांचे घर खरेदी करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने म्हाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेतलाय. आता १२ लाखांत आपल्याला स्वत: चे घर खरेदी करता येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांठी पालिका प्रशासनाने म्हाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईच्या माहुल परिसरात ४,७०० घरे बांधण्यात आली आहे. या घरांची किंमत १२ लाख ६० हजार रूपये इतके असून, ही घरे लॉटरीच्या माध्यमातून विकली जाणार आहेत. या घरांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांना सोमवारपासून अर्ज करता येणार आहे.

Mhada Lottery
Badlapur: बदलापुरातील प्रदुषणकारी कंपन्यांना राज्य सरकारचा दणका, २४ MIDC कंपन्यांवर कारवाई

माहुलमधील तब्बल १३ हजारांपेक्षा जास्त घरांना गेल्या काही दिवसांत खरेदीदार मिळाले नाहीत. त्यामुळे बीएमसी म्हडाच्या मार्फत या घराची लॉटरी काढणार आहे. अनेक दिवसांपासूना रिक्त असणाऱ्या या सदनिकांच्या देखभालीचा खर्च पालिकेला करावा लागतोय. त्यामुळे या सदनिका आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मालकी तत्वावर विकण्याचा निर्णय घेतलाय.

एमएमआरडीएनं प्रकल्पबाधितांसाठी इमारती बांधून त्यातील सदनिकांचे हस्तांतरण महापालिकेला केले. विविध विकास प्रकल्पांमध्ये घर बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना माहुल येथील सदनिकांमध्ये राहण्यासाठी घरे उपलब्ध करून दिली जात आहेत.

Mhada Lottery
Politics: 'ऐ शिपाई, ठुमका लाव नाहीतर...', माजी मंत्र्यांची कुर्ता फाड धुळवड; पोलिसांनाही नाचवलं, VIDEO व्हायरल

या इमारतीच्या संकुलात शाळेसह रूग्णालय आणि इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. जर कर्मचाऱ्यांना हे घर विकायचे असल्यास ५ वर्षांनंतर कधीही विकू शकतात. यासाठी सोमवारपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com